युकी लढला; पण हरला
By Admin | Updated: January 20, 2015 00:25 IST2015-01-20T00:25:25+5:302015-01-20T00:25:25+5:30
आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या ब्रिटनच्या अँडी मरेविरुद्ध भारताच्या युकी भांबरी याने झुंजार खेळ केला़

युकी लढला; पण हरला
मेलबोर्न : आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या ब्रिटनच्या अँडी मरेविरुद्ध भारताच्या युकी भांबरी याने झुंजार खेळ केला़ मात्र ,अखेर या भारतीय खेळाडूला विजय मिळविता आला नाही़
स्पर्धेच्या पुरुष गटातील एकेरी सामन्यात क्वालिफायर युकीने मरेला तब्बल २ तास आणि १३ मिनिटे झुंज दिली; मात्र, अखेर या लढतीत मरेने ६-३, ६-४, ७-६ अशी बाजी मारली़
भारताच्या युकीने या सामन्यात अनेक चांगले फटके लावले आणि आपल्या शानदार सर्व्हिसच्या जोरावर अनुभवी मरेला चांगलीच झुंज दिली़ विशेष म्हणजे, युकीने ब्रिटनच्या या नंबर वन खेळाडूची दोन वेळा सर्व्हिस भेदण्यात यश मिळविले़ (वृत्तसंस्था)