युकी करणार भारताचे नेतृत्व
By Admin | Updated: November 27, 2015 00:38 IST2015-11-27T00:38:48+5:302015-11-27T00:38:48+5:30
चेन्नई ओपन या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व युकी भांबरी करणार आहे. ४ ते १० जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत गत

युकी करणार भारताचे नेतृत्व
चेन्नई : चेन्नई ओपन या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व युकी भांबरी करणार आहे. ४ ते १० जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत गत विजेता आणि चौथ्या क्रमांकाचा खेळाडू स्टानिस्लास वावरिंका हा देखील सहभागी होणार आहे.
भारताकडून एकेरीतील खेळाडू युकी या वर्षी रँकिंगमध्ये पहिल्या शंभरात पोहचला होता.
या महिन्याच्या सुरूवातीला रँकिंगमध्ये ८८ व्या स्थानावर होता. जेव्हा सत्राच्या शेवटी तो ९१ व्या स्थानावर होता.
चेन्नई ओपनमध्ये वावरिंका शिवाय केविन एंडरसन, बेनोईट पेयरे, राबर्टो बातिस्टा एगट, जाईल्स मुलेर, वासेक पोस्पिसिल, बोर्ना कोरिच आणि एजाज बेडेने सहभागी होणार आहेत.