यू मुंबाचा धडाका कायम
By Admin | Updated: August 13, 2015 04:11 IST2015-08-13T04:11:10+5:302015-08-13T04:11:10+5:30
प्रो कबड्डीच्या दुसऱ्या सत्रात तुफान फॉर्ममध्ये असलेल्या बलाढ्य यू मुंबा संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखताना यजमान बंगळुरु बुल्सला त्यांच्या घरच्या मैदानावर ३६-२९ असे सहजरीत्या

यू मुंबाचा धडाका कायम
बंगळुरु : प्रो कबड्डीच्या दुसऱ्या सत्रात तुफान फॉर्ममध्ये असलेल्या बलाढ्य यू मुंबा संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखताना यजमान बंगळुरु बुल्सला त्यांच्या घरच्या मैदानावर ३६-२९ असे सहजरीत्या लोळवले. या विजयासह यू मुंबाने गुणांचे अर्धशतक करताना गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावून स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे.
या एकतर्फी सामन्यात यू मुंबाने अपेक्षित वर्चस्व राखताना आक्रमक खेळ करुन यजमानांना पुनरागमनाची संधी दिली नाही. सुरुवातीपासूनच सामन्यावर नियंत्रण राखलेल्या मुंबईकरांनी संपूर्ण सामन्यात भक्कम बचाव करताना बंगळुरुच्या आक्रमकांना दडपणाखाली ठेवले. जीवा कुमार, मोहित चिल्लर आणि सुरेंदर नाडा यांच्या मजबूत पकडींच्या जोरावर मध्यंतरालाच मुंबईकरांनी एक लोण चढवून १८-११ अशी मोठी आघाडी घेत सामन्यावर नियंत्रण राखले. यानंतर यजमानांनी सामन्यात पुनरागमनाचे प्रयत्न केले. मात्र त्यांचे आक्रमक मुंबईचा बचाव भेदण्यात अपयशी ठरल्याने बंगळुरु संघ पिछाडीवर पडला. त्याचवेळी कर्णधार अनुप कुमार, रिशांक देवाडीगा
आणि भूपेंद्र सिंग यांनी खोलवर व आक्रमक चढाया करुन बंगळुरुच्या आव्हानातील हवा काढली. (वृत्तसंस्था)
स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डी २0१५ साखळी गुणतक्ता
संघाचे नाव सामने विजयी पराभूत गुण
यू मुंबा१११०१५०
तेलुगू टायटन्स१२७२४५
बंगळुरु बुल्स१०६४३२
जयपूर पिंक पॅँथर्स११५५३१
दबंग दिल्ली१२४७२६
पटणा पायरट्स१0४५२५
बंगाल वॉरियर्स११२८१६
पुणेरी पलटन९१७१३