युवा क्रिकेट संघाचा कर्णधार इशानला अटक
By Admin | Updated: January 14, 2016 03:12 IST2016-01-14T03:12:54+5:302016-01-14T03:12:54+5:30
बांगलादेशात याच महिन्यात सुरू होत असलेल्या १९ वर्षे गटाच्या विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झालेला इशान किशन याला पोलिसांनी हलगर्जीपणाने

युवा क्रिकेट संघाचा कर्णधार इशानला अटक
पाटणा : बांगलादेशात याच महिन्यात सुरू होत असलेल्या १९ वर्षे गटाच्या विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झालेला इशान किशन याला पोलिसांनी हलगर्जीपणाने वाहन चालविल्याप्रकरणी ताब्यात घेतले.
मीडिया वृत्तानुसार किशन हा वडिलांची कार चालवत होता. यादरम्यान त्याने आॅटोला धडक दिली. यामुळे आॅटोत बसलेले प्रवासी जखमी झाले. घटना घडल्यानंतर उपस्थितांसोबतही किशनने असभ्य वर्तन केले.
गर्दीतील काहींनी किशनला ओळखले नसल्याने त्याला मारहाण केली. याचवेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने त्यांनी किशनसह अन्य काहींना अटक केली. १७ वर्षांचा किशन झारखंडसाठी खेळतो. त्याने दहा रणजी सामन्यात एका शतकासह पाच अर्धशतकाच्या मदतीने ७३६ धावा केल्या आहेत. बांगलादेशात २७ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या १९ वर्षे गटाच्या विश्वचषकासाठी त्याला भारतीय संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले होते. (वृत्तसंस्था)