युनिस, रझ्झाकने वकारला दोषी धरले
By Admin | Updated: December 13, 2015 23:17 IST2015-12-13T23:17:38+5:302015-12-13T23:17:38+5:30
पाकिस्तानचे दिग्गज खेळाडू युनिस खान व अब्दुल रझ्झाक यांनी अलीकडेच वन-डे व टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राष्ट्रीय संघाच्या निराशाजनक कामगिरीसाठी संघाचे

युनिस, रझ्झाकने वकारला दोषी धरले
कराची : पाकिस्तानचे दिग्गज खेळाडू युनिस खान व अब्दुल रझ्झाक यांनी अलीकडेच वन-डे व टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राष्ट्रीय संघाच्या निराशाजनक कामगिरीसाठी संघाचे मुख्य प्रशिक्षक वकार युनूस यांना जबाबदार धरले आहे.
युनिस म्हणाला, ‘ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण नको, जर खेळाडूंना भीती वाटत असेल तर ते देशातर्फे चांगली कामगिरी करू शकत नाहीत.’ रझ्झाक म्हणाला, ‘खेळाडूंना प्रशिक्षकाकडून आत्मविश्वास व आदर मिळणे आवश्यक आहे. जर असे घडत नसेल तर अनुकूल निकालाची अपेक्षा करणे चुकीचे आहे.’
(वृत्तसंस्था)