शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

युवा खेळाडूंमुळे दिल्लीच्या ‘प्ले आॅफ’च्या आशा पल्लवित

By admin | Updated: May 6, 2017 00:42 IST

एक वेळ अशी होती की ऋषभ पंत प्रत्येक चेंडूवर षट्कार मारण्यास इच्छुक होता. कॅरेबियन स्टाईलने तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगमागेही

- रवी शास्त्री - एक वेळ अशी होती की ऋषभ पंत प्रत्येक चेंडूवर षट्कार मारण्यास इच्छुक होता. कॅरेबियन स्टाईलने तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगमागेही स्कूप करताना तर कधी आॅफ साईडवर षट्कार खेचताना दिसला. यातील कुठलाही फटका कमकुवत नव्हता. जेम्स फॉल्कनरने हळुवार टाकलेला चेंडू आधीच समजून घेतला होता. त्याची खेळी इतकी शानदार ठरली की, सचिन तेंडुलकरला देखील आयपीएल-१० मधील सर्वोत्कृष्ट खेळी, असे संबोधावे लागले.१९-२० वर्षांच्या अन्य खेळाडूंसारखाच पंत देखील कुणाची पर्वा करीत नाही. वडिलांच्या निधनाचे दु:ख त्याने पचविले. प्रतिस्पर्धी गोलंदाजाचा दर्जा काय याचीही त्याने तमा बाळगली नाही. २७ वर्षांच्या प्रगल्भ फॉल्कनरलाही त्याने आपल्या बॅटने पाणी पाजले. मनगटाला वळवून त्याने षट्कार खेचले. तो तासभर खेळपट्टीवर स्थिरावला तरी प्रेक्षकांसाठी ही वेळ अविस्मरणीय ठरेल, हे नक्की. ऋषभने रणजित सर्वांत वेगवान शतक ठोकले आहे. महाराष्ट्र संघाविरुद्ध देखील त्याने त्रिशतकी खेळी केली. याच बळावर त्याने भारतीय संघात स्थान पटकविले. १९ वर्षे गटाच्या विश्वचषकापासून राहुल द्रविडने त्याला सोबत ठेवले आहे.पंतच्या तुलनेत २२ वर्षांचा संजू सॅमसन थोडा अनुभवी वाटतो; पण फलंदाजी आणि यष्टिरक्षणात तो देखील दमदार आहे. वेगवान गोलंदाजापुढे स्वमर्जीने फटके मारण्यात संजू पटाईत आहे. षट्कार तर तो सहजपणे मारतो. त्यामुळेच आयपीएलमध्ये संजू आणि पंतच्या षट्कारांची संख्या सारखीच आहे. या दोन्ही युवा खेळाडूंनी दिल्लीच्या मरणासन्न अवस्थेला नवसंजीवनी दिली. उर्वरित तिन्ही सामने दिल्लीला घरच्या मैदानावर खेळायचे आहेत. काहीही घडणे शक्य असल्याने विजयाचा आनंद सध्यातरी साजरा होऊ नये. दिल्लीचे युवा खेळाडू धडाका करीत आहेत, यात शंका नाही. त्यांच्या कामगिरीकडे डोळेझाक होणे शक्यच नाही. (टीसीएम)