अनुभवी इटलीशी युवा इंग्लंड भिडणार

By Admin | Updated: June 14, 2014 04:16 IST2014-06-14T04:16:49+5:302014-06-14T04:16:49+5:30

२00६ चा वर्ल्ड चॅम्पियन आणि अनुभवी इटलीचा संघ शनिवारी युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या इंग्लंडसमोर फिफा विश्वचषक स्पर्धेत ‘ड’ गटात आपला पहिला सामना खेळेल.

Young England will experience veteran Italy | अनुभवी इटलीशी युवा इंग्लंड भिडणार

अनुभवी इटलीशी युवा इंग्लंड भिडणार

मानोस (ब्राझील) : २00६ चा वर्ल्ड चॅम्पियन आणि अनुभवी इटलीचा संघ शनिवारी युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या इंग्लंडसमोर फिफा विश्वचषक स्पर्धेत ‘ड’ गटात आपला पहिला सामना खेळेल.
इंग्लंडच्या तुलनेत इटली संघात जास्त अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. त्यात २00६ साली चॅम्पियन ठरलेल्या तीन खेळाडूंनाही २0१४ च्या वर्ल्डकप संघात स्थान देण्यात आले आहे. या खेळाडूंची संघातील उपस्थिती ही इटलीची जमेची बाजू ठरू शकते. इटलीच्या २00६ च्या संघातील ३६ वर्षीय गोलरक्षक गियानलोइगी बफन आणि ३0 वर्षीय मिडफिल्डर डॅनियले डी रोसी यांचा समावेश केला आहे. इटली संघाने गत चार मोठ्या फुटबॉल स्पर्धेत दोन वेळेस अंतिम फेरी गाठली आहे तसेच गतवर्षी कन्फेडरेशन चषकाच्या उपांत्य फेरीतही त्यांनी मजल मारली होती. याशिवाय, फिफा विश्वचषकात १९७0 आणि १९९४ मध्ये ते उपविजेते होते. (वृत्तसंस्था)

Web Title: Young England will experience veteran Italy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.