यो-यो स्टाईलने टेनिस खेळण्यास उत्सुक - पेस
By Admin | Updated: November 16, 2014 01:21 IST2014-11-16T01:21:39+5:302014-11-16T01:21:39+5:30
पंजाब मार्शल संघाचा खेळाडू असलेला लिएंडर याने आपण आता ‘यो यो हनी सिंग’ स्टाईलने टेनिस खेळणार असल्याचे म्हटले आहे.

यो-यो स्टाईलने टेनिस खेळण्यास उत्सुक - पेस
विनय नायडू ल्ल मुंबई
भारताचा स्टार टेनिसपटू लिएंडर पेस हा सोमवारपासून दिल्लीत सुरू होणा:या चॅम्पियन्स टेनिस लीग (सीटीएल) बद्दल प्रचंड उत्सुक आहे. पंजाब मार्शल संघाचा खेळाडू असलेला लिएंडर याने आपण आता ‘यो यो हनी सिंग’ स्टाईलने टेनिस खेळणार असल्याचे म्हटले आहे.
सध्या अनेक टेनिस लीगचे आयोजन करण्यात येत असल्याचे पाहून भारतीय टेनिसला अच्छे दिन येत असल्याचे हे संकेत असल्याचे तो म्हणाला. पुण्यात 27 नोव्हेंबरपासून सुरू होणा:या प्रिमिअर टेनिस लीगच्या चषकाचे अनावरण त्याच्या हस्ते शनिवारी मुंबईत केले. भारतातील विविध स्तरावरील खेळाडू हे निरनिराळ्या लीगमधून व्यस्त असल्याचे पाहून समाधान वाटत असल्याचे तो म्हणाला.
मी अमेरिकन लीगमध्ये वॉशिंग्टन कॅसल संघाकडून सहा वर्षे खेळत आहे. यापैकी पाचवेळा मी विजेता ठरलो. अमेरिकन प्रेक्षक लीगमध्ये मोठय़ा संख्येने उपस्थिती दर्शवितात आणि पाठिंबा देतात, तशीच पंजाबमधील प्रेक्षकांकडून मिळेल अशी अपेक्षा आहे.