हरूनही वायएमसीच्या खेळाडूंनी जिंकली मने
By Admin | Updated: November 12, 2014 01:25 IST2014-11-12T01:25:16+5:302014-11-12T01:25:16+5:30
नागपाडा येथील बचुखन म्युनिसिपल मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात अॅग्नेल संघाने 46-39 अशी बाजी मारून दुस:या फेरीत प्रवेश केला.

हरूनही वायएमसीच्या खेळाडूंनी जिंकली मने
मुंबई : पायात घालण्यायोग्य बूट नसतानाही बोरीवलीच्या वायएमसीए संघाच्या खेळाडूंनी 12व्या नागपाडा बास्केटबॉल संघटनेच्या निमंत्रित स्पध्रेत मिनी गटात वाशीच्या फादर अॅग्नेल संघाकडून पराभव पत्करला असला तरी उपस्थितांनी त्यांच्या संघर्षाला टाळ्यांच्या कडकडाटासह शाबासकी दिली. नागपाडा येथील बचुखन म्युनिसिपल मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात अॅग्नेल संघाने 46-39 अशी बाजी मारून दुस:या फेरीत प्रवेश केला.
अॅग्नेल संघाने पहिल्या क्वार्टरमध्ये 14-3 अशी आघाडी घेतली असतानाही वायएमसीए संघाच्या खेळाडूंनी जबरदस्त कमबॅक केले आणि हाफ टाइमर्पयत अॅग्नेलची आघाडी 27-19 अशी कमी केली. दुस:या हाफमध्ये सामन्यात कडवा संघर्ष पाहायला मिळाला. तिस:या क्वार्टरमध्ये ही लढत 31-31 अशी बरोबरीत आली. शेवटच्या क्वार्टरमध्ये अॅग्नेलने खेळ उंचावत ही लढत 46-39 अशी जिंकली. विजयी संघाकडून अनिकेत राऊत 26 तर हृषीकेश अवटे 14 गुण करण्यात यशस्वी ठरले. वायएमसीएकडून 38 गुणांची कमाई करीत नीलेश यादव याने एकाकी झुंज दिली. (क्रीडा प्रतिनिधी)
संक्षिप्त निकाल
मिनी बॉय - कॅथेड्रल 24 (शेर्विन 8, सोहान 6) विजयी वि. डॉन बॉस्को ‘बी’ क्; एनबीए 43 (कासीम 14, फराज 6) विजयी वि. मस्तान वायएमसीए ‘बी’ 23 ( दानिश शेख 6, जाकी अनसरी 6)
पुरुष गट- सेंट पिटर फ्लायिंग अपोस्टलेस 5क् (ओनेल फोसेंका 14, जोएल विसेंट 12) विजयी वि. बोरीवली वायएमसीए 32 (प्रशांत दास 9)