होय, मी त्याला ‘गर्भवती’ म्हटले होते : हरभजन
By Admin | Updated: July 3, 2016 04:27 IST2016-07-03T04:27:49+5:302016-07-03T04:27:49+5:30
आॅस्ट्रेलिया दौऱ्यात डॅरेन लीमनच्या स्लेजिंगमुळे त्रस्त झालेल्या हरभजन सिंगने आॅस्ट्रेलिया संघाचे विद्यमान प्रशिक्षक लीमनच्या मोठ्या पोटाकडे इशारा करीत तू ‘गर्भवती’ आहेस

होय, मी त्याला ‘गर्भवती’ म्हटले होते : हरभजन
नवी दिल्ली : आॅस्ट्रेलिया दौऱ्यात डॅरेन लीमनच्या स्लेजिंगमुळे त्रस्त झालेल्या हरभजन सिंगने आॅस्ट्रेलिया संघाचे विद्यमान प्रशिक्षक लीमनच्या मोठ्या पोटाकडे इशारा करीत तू ‘गर्भवती’ आहेस का? असा प्रश्न केला होता. अनुभवी आॅफ स्पिनर हरभजन सिंगने आज (शनिवारी) याचा खुलासा केला. हरभजन म्हणाला,‘‘मी आॅस्ट्रेलियन खेळाडूंच्या स्लेजिंगला नेहमीच प्रत्युत्तर दिले. त्यात लीमन व महान वेगवान गोलंदाज ग्लेन मॅक् ग्रा यांचा समावेश आहे.’’ आॅस्ट्रेलियन खेळाडूंसोबत हरभजनची नेहमीच शाब्दिक चकमक उडत होती.
हरभजन म्हणाला, ‘‘आॅस्ट्रेलियन खेळाडूंना असे वाटते, की केवळ तेच सुपरस्टार आहेत. त्यांना कुणी पराभूत करू शकत नाही.