यावर्षी भारत-पाक क्रिकेट मालिका नाही - अनुराग ठाकूर
By Admin | Updated: January 12, 2016 18:01 IST2016-01-12T18:01:51+5:302016-01-12T18:01:51+5:30
भारताची पाकिस्थान बरोबर यावर्षी कोणतीही मालिका होणार नसल्याच आज बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.

यावर्षी भारत-पाक क्रिकेट मालिका नाही - अनुराग ठाकूर
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - भारताची पाकिस्थान बरोबर यावर्षी कोणतीही मालिका होणार नसल्याच आज बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे. पाकिस्तान बरोबर यावर्षी कोणतीही प्रस्तावित मालिका नाही, भारत पाक बरोबर फक्त आंतरराष्ट्रीय मालिकेदरम्यान खेळेल असे त्यांनी सांगितले त्यामुळे गेल्या वर्षभर भारत - पाक मालिकेच्या रंगलेल्या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे.
भारत - पाक संबंधांमध्ये निर्माण झालेली कटुता व शिवसेनेचा तीव्र विरोध यामुळे ह्या मालिकेचा चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात गेला होता पण आज बीसीसीआयचे सचिव व भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी भारत - पाक मालिका होणार नसल्याच स्पष्ट केलं त्यामुळे क्रिकेटप्रेमींना भारत - पाकिस्तान मालिकेचा थरार अनुभवता येणार नाही. पाकिस्तान संघ २०१२ - १३ मध्ये भारत दौ-यावर आला होता.