यंदाचे वर्ष माझ्यासाठी सुपर डुपर हिट - सानिया

By Admin | Updated: November 21, 2015 01:24 IST2015-11-21T01:24:12+5:302015-11-21T01:24:12+5:30

२०१५ या मोसमात स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिने दोन ग्रॅण्डस्लॅम जेतेपद पटकविले. शिवाय दुहेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावरही झेप घेतली आहे. एका वर्षातील

This year, Super Dumper hit for me - Sania | यंदाचे वर्ष माझ्यासाठी सुपर डुपर हिट - सानिया

यंदाचे वर्ष माझ्यासाठी सुपर डुपर हिट - सानिया

हैदराबाद : २०१५ या मोसमात स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिने दोन ग्रॅण्डस्लॅम जेतेपद पटकविले. शिवाय दुहेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावरही झेप घेतली आहे. एका वर्षातील या सरस कामगिरीची पुनरावृत्ती होणे कठीण असल्याचे मत सानियाने व्यक्त केले आहे.
ती म्हणाली, ‘पुढील सत्रात यापेक्षा सरस कामगिरी करू शकलो नाही तरी किमान मागील वर्षी जे मिळविले ते कायम राखण्याचे आव्हान असेलच. यंदाच्या मोसमात जे कमविले त्यापेक्षा आणखी सरस करणे कठीणच आहे. मार्टिना हिंगीससोबत आणखी हखादी ग्रॅण्डस्लॅम जिंकणे आनंददायी ठरेल.’
सानियाने मार्टिना हिंगीससोबत दोन ग्रॅण्डस्लॅमसोबतच अन्य आठ विजेतेपद देखील पटकविले आहेत. केवळ हेच वर्ष नव्हे तर माझे संपूर्ण करियर शानदार राहिले. यंदा मात्र आम्ही दोघींनी वर्चस्व कायम केले. मी आणि मािर्टनाने गेली अनेक वर्षे कठोर मेहनत केली त्याचे हे फळ आहे.’
मी आणि मार्टिना एकमेकींना पूरक आहोत. परस्परांना आम्ही सहकार्य करतो. कोर्टच्या आत आणि बाहेरही आमचा समन्वय आहे. पुढील वर्षी आणखी आव्हान मिळण्याची शक्यता असल्याने गरज भासल्यास दोघीही खेळात बदल करण्याची तयारी ठवू, असे सानियाने सांगितले.
यापेक्षा वेगळा बदल करण्याची गरज भासणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करीत सानिया पुढे म्हणाली, ‘पुढील सत्रात प्रतिस्पर्धी तीन जोड्या तयारीनिशी खेळणार असल्याने आम्हीदेखील जेतेपद कायम राखण्याच्या इराद्यानिशी खेळू. आम्ही दीर्घ काळापासून अपराजित असल्याने आम्हाला नमविण्याचा प्रतिस्पर्धी जोडी विचार करत असतील.
गरज भासेल तेव्हा खेळात बदल करण्याची आमची तयारी आहेच पण माझ्यामते सध्यातरी खेळ आहे तसाच ठेवू. पदक जिंकण्यासाठी प्रत्येक खेळाडू खेळतो पण खेळात काहीही सातत्यपूर्ण नसते. विजय मिळाला नाही तरी जीवन थांबणार नाही. विजय मिळाला तर मात्र स्वप्नपूर्तीचा आनंद मिळतो. पुढील वर्षी आॅलिम्पिक पदक जिंकण्याची तयारी करीत आहे पण कुठल्याही स्पर्धेत पदक जिंकण्याची हमी नसल्याचेही सानियाने स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)

Web Title: This year, Super Dumper hit for me - Sania

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.