बॉक्सर सरितावर वर्षभराची बंदी
By Admin | Updated: December 18, 2014 05:13 IST2014-12-18T05:13:03+5:302014-12-18T05:13:03+5:30
इंचियोन आशियाडमध्ये कांस्य पदक स्वीकारण्यास नकार देणारी भारताची बॉक्सर एल. सरितादेवी हिच्यावर आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने

बॉक्सर सरितावर वर्षभराची बंदी
नवी दिल्ली : इंचियोन आशियाडमध्ये कांस्य पदक स्वीकारण्यास नकार देणारी भारताची बॉक्सर एल. सरितादेवी हिच्यावर आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने (एआयबीए) वर्षभराची बंदी लादली आहे. पण, यामुळे सरिताचे करियर संकटात
येणार नाही. ती २०१६ च्या आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेत भाग घेऊ शकणार
आहे.
आशियाडमध्ये महिला बॉक्सिंगच्या सेमिफायनलमध्ये रेफ्रीच्या वादग्रस्त निर्णयामुळे सरिताने कांस्य स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे तिच्यावर १ आॅक्टोबर २०१४ ते १ आॅक्टोबर २०१५ या कालावधीसाठी बंदी लावण्यात आली. याशिवाय तिला एक हजार स्विस फ्रँक दंडाच्या स्वरुपात भरावे लागतील. वारंवार माफी मागितल्यानंतरही एआयबीएने सरिताला माफ केले नाही. लाईटवेट(६० किलो) गटात खेळणारी सरिता सध्या उजव्या हाताचे मनगट फ्रॅक्चर झाल्यामुळे त्रस्त आहे. त्यात वर्षभराच्या बंदीमुळे तिला काहीसा दिलासा मिळाला.
राष्ट्रीय कोच गुरुबक्षसिंग संधू हे शिक्षेतून बचावले. अन्य दोन कोचेससह त्यांना देखील अस्थाई स्वरुपात निलंबित करण्यात आले होते. एआयबीएच्या शिस्तपालन समितीने त्यांना दोषी धरले नाही. क्यूबाचे भारतीय कोच ब्लास इग्लेसियास यांच्यावर दोन वर्षांची बंदी आणि २००० हजार स्विस फ्रँकचा दंड ठोठावण्यात आला. एआयबीएच्या शिस्तपालन समितीने सरिताचे
खासगी कोच लेनिन मितेई यांच्यावर देखील वर्षभराची बंदी घातली. सरिताचे पती थोयबासिंग यांना
देखील दोन वर्षांसाठी रिंगसाईड
प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.(वृत्तसंस्था)