यंदा १३६९ पदकांसाठी संग्राम
By Admin | Updated: January 30, 2015 00:47 IST2015-01-30T00:47:45+5:302015-01-30T00:47:45+5:30
केरळ येथे होत असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी ३३ क्रीडा प्रकारांत देशातील ३० राज्ये व पाच केंद्रशासित प्रदेशांतील खेळाडू सहभागी होत आहेत.

यंदा १३६९ पदकांसाठी संग्राम
केरळ येथे होत असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी ३३ क्रीडा प्रकारांत देशातील ३० राज्ये व पाच केंद्रशासित प्रदेशांतील खेळाडू सहभागी होत आहेत. त्रिवेंद्रम मीनामकुलम येथील क्रीडानगरीदेखील त्यासाठी सज्ज झाली आहे. जलतरण, धनुर्विद्या, अॅथलेटिक्स, मुष्टियुद्ध, नेमबाजी, व्हॉलिबॉल, टेनिस, फुटबॉल, कबड्डी, बॅडमिंटन, कुस्ती, खो-खो अशा विविध ३३ क्रीडा प्रकारांत प्रत्येकी ४१४ सुवर्ण, ४१४ रौप्य व ५४१ कांस्यपदकांची लयलूट खेळाडू करतील. केरळमधील सात जिल्ह्यांमध्ये ही स्पर्धा होणार आहे.
मीनामकुलम येथील क्रीडानगरीत खेळाडूंसाठी तब्बल पाच हजार क्षमतेची घरे बांधण्यात आली आहेत. या क्रीडाग्रामपासून उद््घाटन व समारोपाचा सोहळा असलेल्या कर्यावट्टम हे क्रीडा स्टेडियम केवळ तीन किलोमीटर अंतरावर आहे. तसेच येथून १५ ते २५ किलोमीटर अंतरावर इतर स्पर्धेची ठिकाणे आहेत. किचन, ओपन एअर थिएटर, हेल्थ क्लब, मेडिकल सुविधादेखील येथे करण्यात आल्या आहेत. (क्रीडा प्रतिनिधी)