यासिर शाहच्या फिरकीची कमाल, पहिल्या कसोटीत पाकिस्तानचा विजय

By Admin | Updated: April 26, 2017 05:02 IST2017-04-26T05:02:15+5:302017-04-26T05:02:38+5:30

यासिर शाहने दुस-या डावात घेतलेल्या 6 विकेटच्या जोरावर पाकिस्तानने पहिल्या कसोटी सामन्यात...

Yasir Shah's spin, Pakistan's victory in the first Test | यासिर शाहच्या फिरकीची कमाल, पहिल्या कसोटीत पाकिस्तानचा विजय

यासिर शाहच्या फिरकीची कमाल, पहिल्या कसोटीत पाकिस्तानचा विजय

>ऑनलाइन लोकमत
किंग्जस्टन, दि. 25 - यासिर शाहने दुस-या डावात घेतलेल्या 6 विकेटच्या जोरावर पाकिस्तानने पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव केला. यासोबत पाकिस्तानने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात 121 धावांनी पिछाडीवर असलेल्या यजमान वेस्ट इंडीजचा दुसरा डाव यासिर शाहच्या मा ऱ्यासमोर अवघ्या 152 धावांत गुंडाळला गेला. त्यामुळे विजयासाठी मिळालेलं अवघं 32 धावांचं आव्हान पाकिस्तानने उपहाराच्या थोड्याचवेळानंतर साध्य केलं पण त्यांना तीन विकेट गमवाव्या लागल्या. 
 
युनिस खान(6) बाद झाल्यावर मैदानात आलेल्या मिसबाह उल-हकने(12*) वेस्ट इंडिजचा गोलंदाज बिशूचा पहिला चेंडू खेळून काढला त्यानंतरच्या दोन चेंडूवर दोन षटकार ठोकत त्याने विजयाची औपचारीकता पूर्ण केली. पहिल्या डावात मिसबाह 99 धावांवर नाबाद राहिला होता. 
 
त्यापुर्वी नाणेफेक जिंकून पाकिस्तानने वेस्ट इंडिजला पहिले फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने भेदक मारा करत वेस्ट इंडिजच्या 6 विकेट घेतल्या आणि त्यांचा डाव 286 धावांमध्ये आटोपला. प्रत्युत्तरात मिसबाह आणि युनिस खान(58), सरफराज अहमद (54) यांच्या अर्धशतकांच्या बळावर 407 धावा करत 121 धावांची आघाडी घेतली.  पहिल्या डावात 121 धावांनी पिछाडीवर असलेल्या यजमान वेस्ट इंडीज संघाचा दुसरा डाव फिरकी गोलंदाज यासिर शाहच्या मा-यासमोर अवघ्या 152 धावात गुंडाळल्या गेला. किरोन पॉवेल (49) चा अपवाद वगळता अन्य फलंदाजांनी केवळ हजेरी लावण्याचं काम केलं.  विजयासाठी मिळालेलं 32 धावांच लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या पाकिस्तानचे अहमद शेहझाद(6), अझर अली(1) आणि युनिस खान(6) हे फलंदाज स्वस्तात बाद झाले.   
                         
संक्षीप्त धावफलक: विंडीज पहिला डाव: 286 दुसरा डाव: 152
पाक पहिला डाव: 407
दुसरा डाव: 3 बाद 36

Web Title: Yasir Shah's spin, Pakistan's victory in the first Test