यादव अस्सल वेगवान गोलंदाज

By Admin | Updated: June 5, 2015 01:01 IST2015-06-05T01:01:36+5:302015-06-05T01:01:36+5:30

वेस्ट इंडीजचा महान वेगवान गोलंदाज अँडी रॉबर्टस हे भारताचा तेजतर्रार गोलंदाज उमेश यादव याच्यामुळे खूपच प्रभावित आहे आणि त्याच्या मते तो भारताचा पहिला अस्सल वेगवान गोलंदाज आहे.

Yadav is a genuine fast bowler | यादव अस्सल वेगवान गोलंदाज

यादव अस्सल वेगवान गोलंदाज

नवी दिल्ली : वेस्ट इंडीजचा महान वेगवान गोलंदाज अँडी रॉबर्टस हे भारताचा तेजतर्रार गोलंदाज उमेश यादव याच्यामुळे खूपच प्रभावित आहे आणि त्याच्या मते तो भारताचा पहिला अस्सल वेगवान गोलंदाज आहे. तथापि, यादवने अधिक जास्त आक्रमक होण्याची आवश्यकता असल्याची पुश्तीही रॉबर्टस यांनी जोडली आहे.
रॉबर्टस म्हणाले की, ‘मी यादवमुळे खूप प्रभावित आहे. तो भारताचा पहिला अस्सल वेगवान गोलंदाज आहे. माझ्या मते याआधी भारताजवळ एकही अस्सल वेगवान गोलंदाज नव्हता. अन्य एक खेळाडू शमीदेखील चांगला आहे; परंतु मी या दोघांत जास्त आक्रमकता पाहू इच्छितो.’
रॉबर्टला यांना ते जेव्हापासून खेळतो तेव्हापासून आतापर्यंत सर्वांत वेगवान गोलंदाज कोण होता, असे विचारण्यात आले तेव्हा त्यांनी यादवआधी फार काही खेळाडू नव्हते, असे सांगितले.
ते म्हणाले की, ‘एक वेगवान गोलंदाज आणि तेजतर्रार तुफानी गोलंदाज यात खूप अंतर असते. कपिलदेव एक स्विंग गोलंदाज होता; परंतु तो तेजतर्रार गोलंदाज नव्हता. माझ्या मते जवागल श्रीनाथ भारताचा सर्वांत तेजतर्रार गोलंदाज होता; परंतु तो यादवच्या श्रेणीतील गोलंदाज नव्हता.’ या दिग्गज कॅरेबियन गोलंदाजास तो ख्रिस गेल आणि अ‍ॅबी डिव्हिलियर्स यांना कशी गोलंदाजी केली असते असे विचारले असता ते म्हणाले, ‘ज्याप्रमाणे वजनदार बॅटीचा फलंदाज प्रयोग करतात मी त्यांना हूक करण्यासाठी मजबूत केले असते. मी आखूड टप्प्याच्या चेंडूंचा प्रभावीपणे उपयोग केला असता. वजनदार बॅटने हूक करणे सोपे नसते. आजकाल वेगवान गोलंदाज उसळता चेंडू टाकण्यापेक्षा लेंग्थवर गोलंदाजी करतात.’(वृत्तसंस्था)

Web Title: Yadav is a genuine fast bowler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.