शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कुस्ती : महाराष्ट्रच्या रेश्माची कांस्यपदकाची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 20:15 IST

विनेश, साक्षी, अनिता यांना सुवर्णपदक

ठळक मुद्देगुरशरण कौरला सुवर्णपदक तर, नीतूला रौप्यपदक

जालंधर :  महाराष्ट्रच्या रेश्माने चमकदार कामगिरी करत वरीष्ठ गट कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत 62 किलो वजनीगटात कांस्यपदकाची कमाई केली. यासोबतच विनेश, साक्षी, अनिता यांनी आपापल्या गटात चमक दाखवत सुवर्णपदक मिळवले.    रेश्माची पहिलीच कुस्ती हरियाणाच्या राधिका हिच्या बरोबर होती यामध्ये रेश्मा 8-3 अशी आघाडीवर होती पण शेवटच्या 15 सेकंदात राधिकाने चार गुणांची कमाई केली व यामुळे लढत 8-8 अशी बरोबरीत राहिली. यामुळे रेश्माचा  निसटता पराभव झाला.पण,  रिपॅचस राउंड मध्ये रेश्मा ला हिमाचल च्या सुमन ठाकुर सोबत  बाय  मिळाला.यानंतर कांस्यपदक लढतीत तिने उत्तर प्रदेशच्या  फ्रीडम यादवला चितपट करुन पदक मिळवले. रेश्माला लक्ष्य फाउंडेशनचा पाठिंबा आहे.    अन्य लढतीमध्ये हरयाणाच्या अनिताने रेल्वेच्या दिव्या काकरानला 68 किलो वजनी गटात पराभूत केले. तिच्या सुवर्ण कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले. त्यामुळे राष्ट्रकुल कांस्यपदक विजेता दिव्या काकरानला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. रेल्वेच्या विनेशने 20 वर्षीय हरयाणाच्या अंजूला 7-3 अशा फरकाने पराभूत करत राष्ट्रीय स्पर्धेतील आपले सलग दुसरे सुवर्णपदक मिळवले.    रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या साक्षीने 62 किलो वजनीगटात सुवर्णपदक मिळवले. हरयाणाच्या राधिकाला तिने 4-2 असे नमविले. पंजाबच्या गुरशरण कौरने 76 किलो वजनी गटात हरयाणाच्या पूजाला 4-2 अशा फरकाने पराभूत केले. चंदिगढच्या नीतूला 57 किलो वजनीगटात सरिता मोरकडून  पराभूत व्हावे लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 65 किलो गटाच्या अंतिम सामन्यात हरयाणाच्या निशाने रेल्वेच्या नवजोतवर 4-1 असा विजय मिळवला. हरयाणाच्या मुलींनी चमकदार कामगिरी करत पदक तालिकेत 215 गुणांसह आघाडी घेतली.

टॅग्स :Wrestlingकुस्तीMaharashtraमहाराष्ट्र