कुस्तीपटू साक्षीच्या हातावर सजली मेंदी

By Admin | Updated: April 2, 2017 02:06 IST2017-04-02T02:06:59+5:302017-04-02T02:06:59+5:30

रिओ आॅलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावलेली कुस्तीपटू साक्षी मलिक लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. २ एप्रिल रोजी साक्षी हिचा

Wrestlers can be seen in the hands of witness | कुस्तीपटू साक्षीच्या हातावर सजली मेंदी

कुस्तीपटू साक्षीच्या हातावर सजली मेंदी

रोहतक : रिओ आॅलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावलेली कुस्तीपटू साक्षी मलिक लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. २ एप्रिल रोजी साक्षी हिचा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सत्यव्रत कादियान याच्यासोबत विवाह होणार आहे. तिचा विवाहसोहळा आहे. तिच्या मेंदी कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मेंदी काढण्यासाठी खास दिल्लीहून एका डिझाइनरला बोलावण्यात आले आहे. (आॅनलाइन लोकमत)

लग्नसोहळा संस्मरणीय करण्याचे प्रयत्न
साक्षीचं लग्न संस्मरणीय करण्यासाठी स्वत: साक्षी आणि तिचे कुटुंबीय एक कसर सोडत नाहीत. साक्षीची आई सुदेश आणि वडील सुखबीर मलिक यांनी आपल्या लाडक्या लेकीचं लग्न अगदी खास पद्धतीने करण्यासाठी याची जबाबदारी रोहतकमधील एका वेडिंग व इव्हेंट प्लानरवर सोपवली आहे. लग्न घर असल्यामुळे पाहुणे, नातेवाइकांची उपस्थित वाढत आहे. सध्या लग्नापूर्वीच्या विधी केल्या जात आहेत.

पंतप्रधान, हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रण
या हायप्रोफाईल विवाहसोहळ्यात सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग यांच्यासहीत क्रीडाक्षेत्रातील अनेक दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या लग्नसोहळ्यासाठी जवळपास १२ हजार पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनाही आमंत्रण देण्यात आल्याची माहिती आहे.

Web Title: Wrestlers can be seen in the hands of witness