शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

'गोल्डन कामगिरी'! विनेश फोगाटने 'भाव' खाल्ला; एक डील अन् कोट्यवधींचा वर्षाव, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 17:08 IST

अंतिम फेरी गाठणाऱ्या विनेशला अखेरच्या क्षणी पदकाला मुकावे लागले.

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये कुस्तीपटू विनेश फोगाटने सुवर्ण कामगिरीच्या दिशेने पाऊल टाकले. अंतिम फेरी गाठणाऱ्या विनेशला अखेरच्या क्षणी पदकाला मुकावे लागले. खरे तर फायनलआधी तिचे १०० ग्रॅम वजन वाढले अन् भारताची शिलेदार पदकाच्या शर्यतीतून बाहेर झाली. अखेर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले पण किमान रौप्य मिळेल या आशेवर असलेल्या भारतीयांना इथेही मोठा धक्का बसला. विनेशला खाली हात मायदेशात परतावे लागले. मात्र, तिने केलेल्या गोल्डन कामगिरीने तमाम देशवासियांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. आता विनेशच्या कमाईत देखील मोठी वाढ होणार असल्याचे दिसते. 

विनेशच्या ब्रँड एंडोर्समेंट फीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. आता ती एका डीलसाठी ७५ लाख ते १ कोटी रुपये आकारते. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसली तरी विनेशची ब्रँड व्हॅल्यू चांगलीच वाढली आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, विनेशला साईन करण्यासाठी जवळपास १५ ब्रँड तयार आहेत. आता तिच्या फीमध्ये मोठी वाढ झाली आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ पूर्वी विनेश एका ब्रँडकडून एका वर्षासाठी २५ लाख रुपये आकारत असे. मात्र आता हे शुल्क ७५ लाख ते १ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. 

विनेश फोगाटने 'भाव' खाल्लापॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेशला पदक मिळाले नाही पण तिच्या खेळीने सर्वांना आपलेसे केले. जगभरातील नामांकित पैलवान पराभवाची धूळ चारत विनेशने अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे विनेशचे नाव इतके प्रसिद्ध झाले की अनेक ब्रँड्स तिला साइन करायला तयार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे विनेशसह नीरज चोप्रा आणि दोन कांस्य पदक जिंकणारी नेमबाज मनू भाकर यांनीही जाहीरातीच्या माध्यमातून बक्कळ कमाई केली. 

दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये गोल्डन कामगिरी करण्याचे स्वप्न हुकताच विनेश फोगाटने कुस्तीला रामराम केले. या स्टार महिला कुस्तीपटूचे भारतात परतल्यावर जंगी स्वागत करण्यात आले. हरियाणाचे प्रमुख काँग्रेस नेते दीपेंद्र हुड्डा विनेशच्या स्वागतासाठी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले होते. त्यांच्या येण्याने विनेशच्या राजकारणात प्रवेश झाल्याच्या बातम्यांना उधाण आले आहे.

टॅग्स :Vinesh Phogatविनेश फोगटWrestlingकुस्तीparis olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४