'वॉव'रिन्का... फ्रेंच ओपनमध्ये जोकोविचचा केला पराभव
By Admin | Updated: June 7, 2015 22:03 IST2015-06-07T22:03:10+5:302015-06-07T22:03:10+5:30
अव्वल मानांकित नोवाक जोकोविचचा पराभव करत स्टॅनिलास वॉवरिन्काने फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले आहे.

'वॉव'रिन्का... फ्रेंच ओपनमध्ये जोकोविचचा केला पराभव
ऑनलाइन लोकमत
पॅरिस, दि. ७ - अव्वल मानांकित नोवाक जोकोविचचा पराभव करत स्टॅनिलास वॉवरिन्काने फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. वॉवरिन्काने जोकोविचचा ४-६, ६-४, ६-३, ६-४ ने पराभव केला.
रविवारी फ्रेंच ओपनमध्ये पुरुष एकेरीची अंतिम लढत पार पडली. अँडी मरेचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश करणारा नोवाक जोकोविचसमोर वॉवरिन्काचे आव्हान होते. जोकोविचने पहिला सेट ६-४ ने जिंकत सामन्यात आघाडी घेतली. मात्र यानंतर वॉवरिन्काने दमदार पुनरागमन करत सलग तीन सेटमध्ये विजय मिळवला. २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावल्यानंतर वॉवरिन्काने हे दुसरे जेतेपद पटकावले आहे. वॉवरिन्काच्या खेळीने जोकोविचची सलग २८ सामने जिंकण्याची मालिका संपुष्टात आली.