‘जखमी’ पीटरसन आयपीएलमधूनही बाद
By Admin | Updated: May 15, 2015 01:03 IST2015-05-15T01:03:40+5:302015-05-15T01:03:40+5:30
केव्हिन पीटरसनची ‘साडेसाती’ संपण्याचे नाव घेत नाही. अॅशेस मालिकेसाठी इंग्लंड संघात स्थान न मिळू शकलेल्या या आक्रमक फलंदाजाला

‘जखमी’ पीटरसन आयपीएलमधूनही बाद
लंडन : केव्हिन पीटरसनची ‘साडेसाती’ संपण्याचे नाव घेत नाही. अॅशेस मालिकेसाठी इंग्लंड संघात स्थान न मिळू शकलेल्या या आक्रमक फलंदाजाला एकापाठोपाठ एक निराशेचे धक्के बसत आहेत. सरेविरुद्ध कौंटीत खेळतेवेळी जखमी झालेला पीटरसन यंदा आयपीएलच्या ‘प्ले आॅफ’ला देखील मुकणार आहे.
ईसीबीचे संचालक अॅण्ड्र्यू स्ट्रॉस यांनी पीटरसनला स्थान नाकारून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाची दारे बंद केली. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादने त्याला संघात घेण्याची तयारी दर्शविली, शिवाय तो रविवारी सामना खेळेल अशी घोषणादेखील केली होती. बीबीसीच्या वृत्तानुसार पीटरसन आयपीएल खेळण्यास इच्छुक होता; पण जखमी असल्याने तो दोन आठवडे क्रिकेटपासून दूर राहील. फेब्रुवारी २०१४ मध्ये इंग्लंड संघातून वगळण्यात आले होते. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे चेअरमन कोलिन ग्रावेस यांनी पीटरसन कौंटी क्रिकेटमध्ये धावा काढून राष्ट्रीय संघासाठी दावेदारी सिद्ध करू शकतो. (वृत्तसंस्था)