शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

अभिमानास्पद; एका किडनीवर अंजू बॉबी जॉर्जनं भारताला मिळवून दिली अनेक पदकं!

By स्वदेश घाणेकर | Updated: December 8, 2020 15:46 IST

भारताची माजी ऑलिम्पिकपटू अंजू बॉबी जॉर्जनं ( Anju Bobby George) सोमवारी एक धक्कादायक माहिती दिली.

भारताची माजी ऑलिम्पिकपटू अंजू बॉबी जॉर्जनं ( Anju Bobby George) सोमवारी एक धक्कादायक माहिती दिली. एका किडनीवर तिनं भारतासाठी दैदिप्यमान कामगिरी केली. तिच्या या माहितीनंतर सर्वांकडून तिचे कौतुक होत आहे. एका मूत्रपिंडाद्वारे आपण २००३च्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत कांस्यपदक पटकावून अन्य स्पर्धामध्येही यश संपादन केले, असा गौप्यस्फोट ऑलिम्पियन लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्ज हिने केला आहे.

२००३च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अंजू बॉबी जॉर्जनं लांब उडीत ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले होते आणि आतापर्यंत जागतिक स्पर्धेत एकाही भारतीय खेळाडूला ट्रॅक अँड फिल्ड इव्हेंटमध्ये पदक जिंकता आलेलं नाही. अंजू ही एकमेव खेळाडू आहे. ''२०००च्या ऑलिम्पिक स्पर्धेत मला दुखापतीमुळे मुकावे लागले होते. तेव्हा मला हे कळलं... मी कशीबशी चालू शकत होते. हळुहळू मी सरावाला सुरुवात केली, परंतु माझं शरीर साथ देत नव्हतं. तरीही मी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर कमबॅक केले. अडथळ्यांवर मात करत, वेदनाशामक गोळ्या घेऊन मी हे यश मिळवले. जागतिक स्पर्धेत एका मूत्रपिंडाद्वारे भाग घेणारी कदाचित मी पहिली खेळाडू असेन. माझी गुणवत्ता किंवा प्रशिक्षकांची जादू असे या यशाचे वर्णन करता येईल,''असेही अंजू म्हणाली.

केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की, ''अंजूने आपली जिद्द, प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर देशाचे नाव उंचावले.''अंजू बॉबी जॉर्जची कामगिरी२००३ ( पॅरीस) जागतिक अजिंक्यपद स्पर्धा - कांस्यपदक२००५ ( माँटे कार्लो) जागतिक अॅथलेटिक्स फायनल - सुवर्णपदक२००२ ( मँचेस्टर) राष्ट्रकुल स्पर्धा - कांस्यपदक२००२ ( बुसान) आशियाई स्पर्धा - सुवर्णपदक२००६ ( दोहा) आशियाई स्पर्धा - रौप्यपदक२००५ ( इंचॉन) आशियाई अजिंक्यपद - सुवर्णपदक२००७ ( अम्मान) आशियाई अजिंक्यपद - रौप्यपदक२००६ ( कोलंबो) दक्षिण आशियाई स्पर्धा - सुवर्णपदक 

टॅग्स :Team Indiaभारतीय क्रिकेट संघIndiaभारत