शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

पवईमध्ये अवतरणार चौसष्ट घरांचे ‘युवराज’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 03:58 IST

भारतामध्ये पहिल्यांदाच जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेची चुरस रंगणार असून, मुंबईतील पवई येथे ही स्पर्धा १ आॅक्टोबरपासून रंगेल.

मुंबई : भारतामध्ये पहिल्यांदाच जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेची चुरस रंगणार असून, मुंबईतील पवई येथे ही स्पर्धा १ आॅक्टोबरपासून रंगेल. या स्पर्धेत एकूण ६६ देशांतील सुमारे ४५० हून अधिक खेळाडूंचा समावेश निश्चित झाला असून, यजमान भारताकडून १४५ खेळाडू जेतेपदासाठी भिडतील.विशेष म्हणजे या स्पर्धेत तब्बल ५६ खेळाडू असे आहेत, ज्यांनी आतापर्यंत आपल्या कारकिर्दीमध्ये किमान एक स्पर्धा जिंकली आहे. शिवाय या स्पर्धेत तीन ग्रँडमास्टर्सही खेळतील. १४, १६ आणि १८ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटात रंगणाऱ्या या स्पर्धेत भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रगनंनंधा आकर्षणाचे केंद्र असेल. तो जगातील दुसºया क्रमांकाचा सर्वांत युवा ग्रँडमास्टर आहे. त्याचबरोबर अर्मेनियाचा सार्गसायान शांत आणि भारताचाच इनियान पी. हे अन्य ग्रँडमास्टर्स स्पर्धेत आपला जलवा दाखवतील.अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना आणि अखिल मराठी बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या या स्पर्धेची नुकत्याच मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमामध्ये घोषणा करण्यात आली. या स्पर्धेच्या निमित्ताने भारताची अव्वल महिला बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने म्हटले की, ‘भारतात आयोजित होणारी ही स्पर्धा कदाचित सर्वांत मोठी आणि प्रतिष्ठित आहे. नवोदित आणि बुद्धिबळप्रेमींसाठी ही स्पर्धा एक पर्वणीच ठरेल. युवा खेळाडूंना या स्पर्धेतून खूप काही शिकण्याची संधी मिळेल, तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह खेळताना त्यांना पुढील वाटचालीसाठी आणखी प्रोत्साहन मिळेल.’या स्पर्धेमध्ये यजमान भारतासह रशिया, अमेरिका, फ्रान्स, इटली आणि अझबैजान यासारख्या प्रमुख देशांतील युवा बुद्धिबळपटूंनी आपला सहभाग निश्चित केला आहे. 

टॅग्स :Chessबुद्धीबळMumbaiमुंबई