World No 1 सायना नेहवालची अंतिम फेरीत धडक
By Admin | Updated: March 28, 2015 18:34 IST2015-03-28T17:08:36+5:302015-03-28T18:34:48+5:30
जागतिक स्तरावर पहिले स्थान मिळवणा-या सायना नेहवालने सेमी फायनलमध्ये युई हाशिमोटोला हरवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

World No 1 सायना नेहवालची अंतिम फेरीत धडक
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - सायना नेहवालने बॅडमिंटनमध्ये जागतिक स्तरावर पहिले रँकिंग प्राप्त केले असून या स्थानावर हक्क सांगणारी ती पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे. आत्तापर्यंत चिनी खेळाडूंची असलेली मक्तेदारी सायनाने मोडली असून इंडिया ओपन ही टूर्नामेंट सुरू असतानाच सायनाने पहिले स्थान मिळवले आहे. शनिवारी इंडिया ओपनमध्ये राशनोक इंटानोनने ऑल इंग्लंड बॅडमिंटन चँपियन कॅरोलिना मरिनला हरवले आणि ती पहिल्या स्थानावरून घसरली आणि सायनाने पहिलं स्थान पटकावलं. सायनाने या टूर्नामेंटमध्ये इंडोनेशियाच्या हना रमाधिनीचा २१-१५, २१-१२ असा पराभव करत शुक्रवारी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.
सायनाने मारली अंतिम फेरीत धडक
शनिवारी सायना नेहवालने जपानच्या युई हाशिमोटोचा सेमी फायनलमध्ये २१ - १५, २१ - ११ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. जागतिक रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर सायना आहे तर युई सीडेड खेळाडू नसून तिची क्रमावीर ३७ आहे. अनुभवी सायनाने सहजरीत्या युईला हरवत फायनलमध्ये प्रवेश केला असून आता तिची गाठ राशनोक इंटानोनशी पडणार आहे.