विश्वचषक जिंकू शकतो : मिसबाह

By Admin | Updated: March 16, 2015 02:03 IST2015-03-16T02:03:37+5:302015-03-16T02:03:37+5:30

रविवारी आयर्लंडविरुद्ध विजय मिळवीत उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरल्यानंतर पाकिस्तान संघाचा कर्णधार मिसबाह उल-हकने सुटकेचा नि:श्वास सोडला

World Cup win: Misbah | विश्वचषक जिंकू शकतो : मिसबाह

विश्वचषक जिंकू शकतो : मिसबाह

अ‍ॅडिलेड : रविवारी आयर्लंडविरुद्ध विजय मिळवीत उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरल्यानंतर पाकिस्तान संघाचा कर्णधार मिसबाह उल-हकने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. या लढतीचे आमच्यावर दडपण होते, अशी कबुली या लढतीत ३९ धावांची खेळी करणाऱ्या मिसबाहने दिली.
मिसबाह म्हणाला, ‘या सामन्याबाबत आमच्यावर मोठे दडपण होते. वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीमुळे विजय साकारता आला. आम्हाला सूर गवसला असून, आम्ही विश्वचषक जिंकू शकतो. गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरत असून, फलंदाजही आपली भूमिका चोख बजावत आहेत.’

Web Title: World Cup win: Misbah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.