विश्वकप जोड २
By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST
कोहलीने पहिल्या ५० धावा ६० चेंडूंमध्ये तर दुसऱ्या ५० धावा ५९ चेंडूंमध्ये पूर्ण केल्या. त्याने धवनसोबत दुसऱ्या विकेटसाठी १२९ धावांची खेळी केली. धवनच्या ७६ चेंडूंच्या खेळीमध्ये ७ चौकार व एका षटकाराचा समावेश आहे. धवन बाद झाल्यानंतर कोहलीने रैनाच्या साथीने १५.३ षटकांत ११० धावांची भागीदारी करीत धावसंख्येला वेग दिला. कोहलीला सोहेलने बाद केले, पण तोपर्यंत त्याने भारतासाठी मोठ्या धावसंख्येचा पाया रचला होता. शतकी खेळी करणारा कोहली दोनदा सुदैवी ठरला. वैयक्तिक ७६ धावांवर असताना हॅरिसच्या गोलंदाजीवर त्याचा उडालेला झेल यष्टिरक्षकाला टिपण्यात अपयश आले. रैनाने ५६ चेंडूंमध्ये ७४ धावांची खेळी करताना ५ चौकार व ३ षटकार ठोकले. (वृत्तसंस्था)