विश्वकप जोड २

By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:45+5:302015-02-15T22:36:45+5:30

कोहलीने पहिल्या ५० धावा ६० चेंडूंमध्ये तर दुसऱ्या ५० धावा ५९ चेंडूंमध्ये पूर्ण केल्या. त्याने धवनसोबत दुसऱ्या विकेटसाठी १२९ धावांची खेळी केली. धवनच्या ७६ चेंडूंच्या खेळीमध्ये ७ चौकार व एका षटकाराचा समावेश आहे. धवन बाद झाल्यानंतर कोहलीने रैनाच्या साथीने १५.३ षटकांत ११० धावांची भागीदारी करीत धावसंख्येला वेग दिला. कोहलीला सोहेलने बाद केले, पण तोपर्यंत त्याने भारतासाठी मोठ्या धावसंख्येचा पाया रचला होता. शतकी खेळी करणारा कोहली दोनदा सुदैवी ठरला. वैयक्तिक ७६ धावांवर असताना हॅरिसच्या गोलंदाजीवर त्याचा उडालेला झेल यष्टिरक्षकाला टिपण्यात अपयश आले. रैनाने ५६ चेंडूंमध्ये ७४ धावांची खेळी करताना ५ चौकार व ३ षटकार ठोकले. (वृत्तसंस्था)

World Cup pair 2 | विश्वकप जोड २

विश्वकप जोड २

हलीने पहिल्या ५० धावा ६० चेंडूंमध्ये तर दुसऱ्या ५० धावा ५९ चेंडूंमध्ये पूर्ण केल्या. त्याने धवनसोबत दुसऱ्या विकेटसाठी १२९ धावांची खेळी केली. धवनच्या ७६ चेंडूंच्या खेळीमध्ये ७ चौकार व एका षटकाराचा समावेश आहे. धवन बाद झाल्यानंतर कोहलीने रैनाच्या साथीने १५.३ षटकांत ११० धावांची भागीदारी करीत धावसंख्येला वेग दिला. कोहलीला सोहेलने बाद केले, पण तोपर्यंत त्याने भारतासाठी मोठ्या धावसंख्येचा पाया रचला होता. शतकी खेळी करणारा कोहली दोनदा सुदैवी ठरला. वैयक्तिक ७६ धावांवर असताना हॅरिसच्या गोलंदाजीवर त्याचा उडालेला झेल यष्टिरक्षकाला टिपण्यात अपयश आले. रैनाने ५६ चेंडूंमध्ये ७४ धावांची खेळी करताना ५ चौकार व ३ षटकार ठोकले. (वृत्तसंस्था)

Web Title: World Cup pair 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.