विश्वकप जोड १

By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:45+5:302015-02-15T22:36:45+5:30

पाकची आशा कर्णधार मिसबाह व शाहीद आफ्रिदी यांच्या कामगिरीवर होती. आफ्रिदीने जडेजाच्या गोलंदाजीवर षटकार ठोकत आपला निर्धार स्पष्ट केला. त्यानंतर आफ्रिदीला मात्र विशेष चमक दाखविता आली नाही. शमीच्या गोलंदाजीवर आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात आफ्रिदीचा उडलेला झेल कोहलीने टिपला. आफ्रिदीने २२ चेंडूंमध्ये २२ धावा केल्या. शमीने त्याच षटकात वहाब रियाज (४) याला तंबूचा मार्ग दाखविला. त्यानंतर पाकिस्तानने ३३ व्या षटकात पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतला. पॉवर प्लेच्या पाच षटकात पाकिस्तानने आफ्रिदी व रियाज यांच्या विकेट गमावित ४४ धावा फटकाविल्या. दरम्यान, मिसबाहने कारकीर्दीतील ३९ वे अर्धशतक पूर्ण केले. मिसबाहने यासिर शाहच्या(१३) साथीने आठव्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. मोहितने यासिरला बाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. पाकला अखेरच्या १० षटक

World Cup pair | विश्वकप जोड १

विश्वकप जोड १

कची आशा कर्णधार मिसबाह व शाहीद आफ्रिदी यांच्या कामगिरीवर होती. आफ्रिदीने जडेजाच्या गोलंदाजीवर षटकार ठोकत आपला निर्धार स्पष्ट केला. त्यानंतर आफ्रिदीला मात्र विशेष चमक दाखविता आली नाही. शमीच्या गोलंदाजीवर आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात आफ्रिदीचा उडलेला झेल कोहलीने टिपला. आफ्रिदीने २२ चेंडूंमध्ये २२ धावा केल्या. शमीने त्याच षटकात वहाब रियाज (४) याला तंबूचा मार्ग दाखविला. त्यानंतर पाकिस्तानने ३३ व्या षटकात पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतला. पॉवर प्लेच्या पाच षटकात पाकिस्तानने आफ्रिदी व रियाज यांच्या विकेट गमावित ४४ धावा फटकाविल्या. दरम्यान, मिसबाहने कारकीर्दीतील ३९ वे अर्धशतक पूर्ण केले. मिसबाहने यासिर शाहच्या(१३) साथीने आठव्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. मोहितने यासिरला बाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. पाकला अखेरच्या १० षटकांत विजयासाठी १०७ धावांची गरज होती. शमीने त्यानंतर मिसबाहला रहाणेकडे झेल देण्यास भाग पाडत पाकला नववा धक्का दिला. मिसबाहने ८४ चेंडूंच्या खेळीमध्ये ९ चौकार मारले व १ षटकार ठोकला. मोहितने सोहेल खान (७) याला बाद करीत विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
त्याआधी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या भारतीय संघातर्फे कोहलीने आपल्या आवडीच्या ॲडिलेड ओव्हल मैदानावर शतक झळकावित सूर गवसल्याचे सिद्ध केले. पाकिस्तानतर्फे युवा वेगवान गोलंदाज सोहेलने (५५ धावात ५ बळी) डेथ ओव्हरमध्ये अचूक मारा केल्यामुळे भारताला अखेरच्या पाच षटकांत केवळ २७ धावा फटकाविता आल्या. कोहलीने कारकीर्दीतील २२ वे शतक झळकाविताना सौरव गांगुलीच्या विक्रमाची बरोबरी केली. पाकला उंच चणीचा गोलंदाज मोहम्मद इरफानकडून चमकदार कामगिरी आशा होती, पण त्याने निराशा केली. १० षटकांत ५६ धावा बहाल करणाऱ्या इरफानची बळीच्या बाबतीत पाटी कोरीच राहिली.

Web Title: World Cup pair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.