विश्वचषक कबड्डी रद्द
By Admin | Updated: October 21, 2015 01:36 IST2015-10-21T01:36:32+5:302015-10-21T01:36:32+5:30
पंजाबमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांनी आगामी विश्वचषक कबड्डी स्पर्धा रद्द केली असल्याची घोषणा मंगळवारी केली.

विश्वचषक कबड्डी रद्द
चंदीगड : पंजाबमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांनी आगामी विश्वचषक कबड्डी स्पर्धा रद्द केली असल्याची घोषणा मंगळवारी केली. येत्या नोव्हेंबर महिन्यात पंजाबमध्ये कबड्डीचा विश्वचषक रंगणार होता.
नुकताच पंजाबमध्ये पवित्र धर्मग्रंथाचा अनादर झाल्याने मोठा हिंसाचार उसळला होता. यामुळे बादल यांनी सुरक्षेच्या कारणावरुन १४ ते २८ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या विश्वचषक कबड्डी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
बादल यांनी सांगितले की, कबड्डी पंजाबी लोकांची ओळख आहे. ग्रामीण भागात हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो. मात्र पवित्र ग्रंथाचा अनादर झाल्याने शीख समुदाय अत्यंत नाराज झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये येथे कोणत्याही क्रीडा स्पर्धाचे आयोजन करणे योग्य ठरणार नाही. (वृत्तसंस्था)