World Cup - सलामीच्या लढतीत भारताकडून इंग्लंडचा 35 धावांनी पराभव
By Admin | Updated: June 24, 2017 22:35 IST2017-06-24T22:26:14+5:302017-06-24T22:35:10+5:30
आयसीसी महिला विश्वकप क्रिकेट स्पर्धेतील सलामीच्या सामन्यातच भारताने इंग्लंडचा 35 धावांनी पराभव केला आहे

World Cup - सलामीच्या लढतीत भारताकडून इंग्लंडचा 35 धावांनी पराभव
भारताला अद्याप विश्वविजेतेपद पटकावता आलेले नाही. यावेळी पात्रता फेरीचा अडथळा पार करीत आठ संघांचा समावेश असलेल्या स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध तीन सामने खेळले असते, तर विश्वकप २०१७साठी त्यांना थेट पात्रता मिळवता आली असती, पण आयसीसी महिला चॅम्पियनशिपमध्ये परंपरागत प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध सामना न खेळल्यामुळे भारताला सहा गुणांचे नुकसान सोसावे लागले. भारत गुणतालिकेत १९ अंकासह पाचव्या स्थानी होता. त्यामुळे भारतीय संघाला श्रीलंकेमध्ये पात्रता फेरी खेळावी लागली. भारताने या स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. रंगतदार अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक गडी राखून विजय मिळवला होता.
मिताली राजच्या रूपाने भारताकडे सर्वांत अनुभवी खेळाडू आहे. अलीकडेच १०० वन-डे सामन्यांत संघाचे नेतृत्व करणारी ती जगातील तिसरी महिला खेळाडू ठरली आहे. तिने सलग सहा सामन्यांत अर्धशतक झळकावले. मिताली कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सराव सामन्यात मितालीने ८५ धावांची खेळी केली होती. भारताने या लढतीत १०९ धावांनी विजय मिळवला होता.