विश्वकप भारत जोड

By Admin | Updated: February 6, 2015 22:35 IST2015-02-06T22:35:30+5:302015-02-06T22:35:30+5:30

कॅप्टन कुल म्हणून आपल्या अनोख्या शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या धोनीने २५४ सामन्यांत ८२६२ धावा फटकाविण्याची कामगिरी केली आहे. त्यात नाबाद १८३ धावांच्या खेळीचा समावेश आहे. त्याने यष्टिपाठी ३०८ बळी घेतले आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये ही विक्रमी कामगिरी आहे. हेलिकॉप्टर शॉटसाठी प्रसिद्ध असलेला आणि अडचणीच्या स्थितीत संघाला सांभाळण्यात माहिर असलेल्या धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने जेतेपद पटकाविले तर भारत वेस्ट इंडीज व ऑस्ट्रेलिया यांच्यानंतर विश्वकप राखण्यात यशस्वी ठरलेला तिसरा देश ठरेल.

World Cup connecting India | विश्वकप भारत जोड

विश्वकप भारत जोड

प्टन कुल म्हणून आपल्या अनोख्या शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या धोनीने २५४ सामन्यांत ८२६२ धावा फटकाविण्याची कामगिरी केली आहे. त्यात नाबाद १८३ धावांच्या खेळीचा समावेश आहे. त्याने यष्टिपाठी ३०८ बळी घेतले आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये ही विक्रमी कामगिरी आहे. हेलिकॉप्टर शॉटसाठी प्रसिद्ध असलेला आणि अडचणीच्या स्थितीत संघाला सांभाळण्यात माहिर असलेल्या धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने जेतेपद पटकाविले तर भारत वेस्ट इंडीज व ऑस्ट्रेलिया यांच्यानंतर विश्वकप राखण्यात यशस्वी ठरलेला तिसरा देश ठरेल.
संघाच्या महत्त्वाच्या खेळाडूंमध्ये २६ वर्षीय विराट कोहलीचे नाव अग्रक्रमावर आहे. सध्या आऊट ऑफ फॉर्म असलेल्या विराटला सूर गवसला तर त्याला रोखणे कठीण असते. या दिल्लीकर फलंदाजाच्या खेळामध्ये लहान वयातच परिपक्वता आली आहे. वन-डेमध्ये त्याचा ९० पेक्षा अधिक स्ट्राईक रेट असून धोकादायक फलंदाजांच्या श्रेणीमध्ये त्याचा समावेश आहे. धोनीकडून कसोटी कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारणाऱ्या विराटकडे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. फलंदाजीमध्ये प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर वर्चस्व गाजविण्यास तो सक्षम आहे. विराटने १५० सामन्यांत ६२३२ धावा फटकाविल्या आहेत.
भारतीय संघाचा मुख्य गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या २८ वर्षीय अश्विनच्या गोलंदाजीमध्ये विविधता आहे. कॅरम बॉल त्याचे महत्त्वाचे अस्त्र आहे. वन-डे क्रिकेटमध्ये तो प्रतिस्पर्धी फलंदाजांना रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. तळाला तो फलंदाजीमध्ये उपयुक्त योगदान देण्यास सक्षम आहे. अश्विनने ८८ सामन्यांत १२० बळी घेतले आहेत. २४ धावांच्या मोबदल्यात ३ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
संघातील सर्वांत युवा खेळाडू २० वर्षीय अक्षर पटेल सरप्राईज पॅकेज ठरण्याची आशा व्यक्त केल्या जात आहे. डावखुरा फिरकीपटू अक्षरने १३ सामन्यांत १६ बळी घेतले आहेत. गोलंदाजी अष्टपैलू असलेल्या अक्षरला आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर वन-डे संघात स्थान मिळाले आहे.





Web Title: World Cup connecting India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.