शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
3
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
4
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
5
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
6
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
7
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
8
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
9
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
10
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
11
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
12
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
13
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
14
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

शेतकऱ्याच्या लेकीनं जागतिक स्पर्धा गाजवली; नव्या राष्ट्रीय विक्रमासह ऑलिम्पिकचे तिकीट पटकावले  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 00:55 IST

World Athletics Championship - भारताच्या पारुल चौधरीने ३००० मीटर स्टीपलचेस प्रकाराच्या अंतिम फेरीत पदक जरी पटकावले नसले तरी, तिने नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला.

World Athletics Championship - भारताच्या पारुल चौधरीने ३००० मीटर स्टीपलचेस प्रकाराच्या अंतिम फेरीत पदक जरी पटकावले नसले तरी, तिने नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला. तिने ९:१५.३१ सेकंदाची वेळ नोंदवली आणि हा भारताचा नवा राष्ट्रीय विक्रम ठरला. तिने या कामगिरीसह २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीटही पक्के केले. फायनलमध्ये पारुलला ११व्या स्थानावर समाधान मानावे लागले. बहरीनच्या विनफ्रेड यावीने ८:५४.२९ सेकंदाच्या वर्ल्ड लिडींग वेळेसह सुवर्णपदक पक्के केले. केनियाची बीट्रीस चेपकोएच ( ८:५८.९८ सें.) आणि केनियाचीच फेथ चेरोथित ( ९:००.६९ सें.) अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकाची मानकरी ठरली. 

पारुलने ९ मिनेटे २४.२९ सेकंदाची वेळ नोंदवून ५वा क्रमांक पटकावून फायनलमध्ये प्रवेश केला होता. ललिता बाबर ( २०१५) हिच्यानंतर जागतिक  स्पर्धेच्या ३००० मीटर स्टीपलचेस प्रकाराची फायनल गाठणारी पारुल ही दुसरी भारतीय महिला ठरली आहे. पारुलने जुलै २०२३ मध्ये बँकॉक येथे पार पडलेल्या आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेतील सुवर्णपदक जिंकले होते.  

मेरठची पारुल ही शेतकऱ्याची मुलगी आहे आणि एकेकाळी ती गावातून स्टेडियमपर्यंत पायी जात असे. पारुलने आतापर्यंत इतकी पदके जिंकली आहेत की एक संपूर्ण खोली पदकांनी भरून गेली आहे. चॅम्पियन पारुलचे वडील किशनपाल यांनी पदकाची खोली बनवली आहे.   

टॅग्स :IndiaभारतOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021