महिला व्हॉलिबॉल स्पर्धा उत्साहात
By Admin | Updated: August 31, 2014 22:51 IST2014-08-31T22:51:11+5:302014-08-31T22:51:11+5:30
नाशिक : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तरीय महिला व्हॉलिबॉल स्पर्धेचे नुकतेच उत्साहात आयोजन करण्यात आले होते.

महिला व्हॉलिबॉल स्पर्धा उत्साहात
न शिक : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तरीय महिला व्हॉलिबॉल स्पर्धेचे नुकतेच उत्साहात आयोजन करण्यात आले होते.जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या सदर स्पर्धेमध्ये जिल्हा प्रशिक्षण केंद्राने विजेतेपद पटकावले, तर गणेश व्यायाम मंदिर संघाने उपविजेतेपद जिंकले. सदर स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक मनीषा हेकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. स्पर्धेचे आठ महिला संघ सहभागी झाले होते. जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या राजश्री शिंदे, प्रियंका पगारे, रुचा साळी, वृषाली कुलकर्णी, मृणाल मराळकर, धनश्री मिठसागर यांनी उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन घडविले. विजयी संघाची जळगाव येथे होणार्या विभागीय महिला स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. यावेळी प्रशिक्षक राजेंद्र शिंदे, दिनेश जाधव, किरण शिंदे आदि उपस्थित होते. फोटो : ३१ एसपीओ १जिल्हास्तरीय महिला व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन करताना मनीषा हेकरे. समवेत राजेंद्र शिंदे, क्रीडा अधिकारी पवार आदि.