महिला संघ थायलंडकडून पराभूत
By Admin | Updated: September 22, 2014 04:21 IST2014-09-22T04:21:31+5:302014-09-22T04:21:31+5:30
भारतीय महिला फुटबॉल संघाला आशियाई स्पर्धेतील लढतीत थायलंडकडून ०-१० ने पराभव स्वीकारावा लागला़

महिला संघ थायलंडकडून पराभूत
इंचियोन : भारतीय महिला फुटबॉल संघाला आशियाई स्पर्धेतील लढतीत थायलंडकडून ०-१० ने पराभव स्वीकारावा लागला़
स्पर्धेतील भारताचा हा सलग दुसरा पराभव ठरला़ याआधी झालेल्या लढतीत विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या दक्षिण कोरियाने भारतावर १०-० ने मात केली़ विशेष म्हणजे स्पर्धेतील पहिल्या लढतीत भारतीय महिला फुटबॉल संघाने मालदीववर १५-० ने विजय मिळवून थाटात स्पर्धेची सुरुवात केली होती़ मात्र, त्यानंतर भारतीय संघाला कामगिरीत सातत्य राखता आले नाही़
या लढतीत भारतीय संघ पहिल्या हाफमध्ये आठ गोलने पिछाडीवर होता़ दुसऱ्या हाफमध्ये या संघाने आपल्या बचावामध्ये सुधारणा केली़ मात्र, त्यांना गोल करता आला नाही़ थायलंडकडून कर्णधार कंजना सुंग निगोईन आणि निसा रोमेयेन यांनी प्रत्येकी चार गोल नोंदविले, तर नाफट सीसरोम आणि पिटसमाई सोर्नसाई यांनी प्रत्येकी एक गोल करताना संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले़ (वृत्तसंस्था)