महिला संघाचा थायलंडवर ३-० ने विजय
By Admin | Updated: September 23, 2014 05:57 IST2014-09-23T05:57:01+5:302014-09-23T05:57:01+5:30
भारतीय महिला संघाने आशियाई स्पर्धेतील ‘अ’ गटाच्या हॉकी लढतीत दुबळ्या थायलंड संघावर ३-० ने मात करीत स्पर्धेत शानदार सलामी दिली़

महिला संघाचा थायलंडवर ३-० ने विजय
भारतीय महिला संघाने आशियाई स्पर्धेतील ‘अ’ गटाच्या हॉकी लढतीत दुबळ्या थायलंड संघावर ३-० ने मात करीत स्पर्धेत शानदार सलामी दिली़ भारतीय संघाने सुरुवातीपासून सामन्यावर पकड मिळविताना प्रतिस्पर्धी संघाला तोंड वर करण्याची संधीच दिली नाही़ विशेष म्हणजे सामन्याच्या सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत थायलंड संघाने आपली पूर्ण ताकद गोल वाचविण्यासाठीच खर्च केली़ पूनम राणी हिने १५ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवीत संघाला आघाडी मिळवून दिली़ दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताला एकही गोल नोंदविता आला नाही;मात्र तिसऱ्या क्वार्टरमध्ये वंदना कटारिया हिने ३९ व्या मिनिटाला गोल करताना संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली़ भारताला चौथ्या क्वार्टरमध्ये सुरुवातीलाच पेनल्टी कॉर्नर मिळाले़ याचा लाभ घेत दीपिकाने ५३ व्या मिनिटाला गोल नोंदवून संघाला ३-० अशी आघाडी मिळवून दिली़ सामन्याच्या अखेरपर्यंत हीच आघाडी कायम राहिली़ भारताला पुढच्या लढतीत चीनचा सामना करायचा आहे़