महिलांना एलिट गटात सर्वसाधारण विजेतेपद

By Admin | Updated: November 9, 2016 02:10 IST2016-11-09T02:10:01+5:302016-11-09T02:10:01+5:30

भारतीय सायकलिंग महासंघ अंतर्गत अलीगढ (उत्तर प्रदेश) येथे झालेल्या झालेल्या राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिलांनी एकूण पाच सुवर्ण

Women's General Championship in Elite Group | महिलांना एलिट गटात सर्वसाधारण विजेतेपद

महिलांना एलिट गटात सर्वसाधारण विजेतेपद

पुणे : भारतीय सायकलिंग महासंघ अंतर्गत अलीगढ (उत्तर प्रदेश) येथे झालेल्या झालेल्या राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिलांनी एकूण पाच सुवर्ण, तीन रौप्य आणि दोन कांस्यपदके जिंकून एलिट गटात सर्वसाधारण विजेतेपद जिंकले.
उत्तर प्रदेश सायकलिंग संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या ऋतुजा सातपुतेने मंगळवारी महिलांच्या ३० किलो मीटर कॅटिरीयम रोड रेसमध्ये १७ गुण संपादन करून सुवर्णपदक जिंकले. ऋतुजाचे या स्पर्धेतील हे दुसरे सुवर्ण आहे. पुरुषांच्या शाहिदाम्मद शब्बीरला पुरुष एलिट १४० किलोमीटर शर्यतीत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या ऋतुजा सातपुतेसह मधुरा वायकरने सांघिक वरिष्ठ गटात व ज्युनिअर गटात प्रत्येकी एक सुवर्ण जिंकले होते. वैष्णवी गबणेने या स्पर्धेत एक सुवर्ण व दोन कांस्यपदके जिंकली. प्रियांका जाधवने १४ वर्षांखालील मुलींच्या गटात एक सुवर्ण, ऋतुजा सोलटने एक सुवर्णपदक जिंकले. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Women's General Championship in Elite Group