महिला स्क्वॅश टीम विजयी
By Admin | Updated: September 25, 2014 03:46 IST2014-09-25T03:46:13+5:302014-09-25T03:46:13+5:30
या गटात पल्लिकल, चिनप्पा आणि अपराजिता यांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंना धूळ चारली़ दीपिकाने पाकिस्तानच्या मारिया टुरपक्कई वजीर हिला धूळ चारली

महिला स्क्वॅश टीम विजयी
इंचियोन : दीपिका पल्लिकल आणि ज्योत्स्ना चिनप्पा यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर भारतीय महिला स्क्वॅश टीमने आशियाई स्पर्धेतील ब गटातील सामन्यात हाँगकाँगनंतर पाकिस्तानवर मात करीत पुढच्या फेरीत प्रवेश केला़
महिलांच्या टीम इन्व्हेंटमध्ये साखळी फेरीच्या पहिल्या सामन्यात दीपिका पल्लिकल, जोत्स्ना चिनप्पा आणि अनाका अलंकामोनी यांनी हाँगकाँगवर २-१ असा विजय मिळविला़ भारतीय महिलांनी यानंतर आपल्या कामगिरीत सातत्य राखताना पाकिस्तानविरुद्ध ३-० ने सरशी साधली़
या गटात पल्लिकल, चिनप्पा आणि अपराजिता यांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंना धूळ चारली़ दीपिकाने पाकिस्तानच्या मारिया टुरपक्कई वजीर हिला धूळ चारली, तर चिनप्पा हिने मुआदास अशरफ पराभूत केले आणि अपराजिताने पाकच्या रिफ्फत खानवर विजय मिळविला़ (वृत्तसंस्था)