शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सोनू सूदनं जिला स्पर्धेसाठी खरेदी करून दिली रायफल, त्या महिला नेमबाज कोनिका लायकनं केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 12:16 IST

दिग्गज नेमबाज जॉयदीप कर्माकर याच्या कोलकाता येथील अकादमीत कोनिका सराव करत होती. माहितीनुसार ती मागील ३-४ दिवसांपासून अकादमीतही गेली नव्हती

भारताची उदनोन्मुख नेमबाज कोनिका लायक ( konica layak ) हिच्या आत्महत्येचे वृत्त समोर येत आहे. झारखंडच्या धनबाद शहरातील कोनिका कोलकाता येथील हॉस्टेलमध्ये राहत होती. तिनं कोलकाता येथील हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त TV9 हिंदीनं दिलं आहे. मागील चार महिन्यांत  आत्महत्या करणारी कोनिका ही चौथी नेमबाज आहे. मागील काही दिवसांपूर्वी पंजाबची १७ वर्षीय नेमबाज खुश सीरत कौर हिनंही आत्महत्या केली होती. तिनं पिस्तुलानं स्वतःला गोळी मारून घेतली होती. खुश सीरत हिनं कनिष्ठ वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्याआधी ऑक्टोबरमध्ये पंजाबची हुनरदीप सिंह सोहल आणि सप्टेंबरमध्ये मोहालीची नमनवीर सिंग बराड यांनी आत्महत्या केली.  

कोनिका लायक ही तिच नेमबाजपटू आहे जिला बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यानं रायफल खरेदी करण्यात मदत केली होती. तिनं जानेवारी महिन्यात ट्विट करून सोनू सूदकडे मदत मागितली होती. ''११व्या झारखंड राज्य रायफल नेमबाज अजिंक्यपद स्पर्धेत मी रौप्यपदक जिंकले. तरीही सरकारकडून मला काहीच मदत मिळत नाही. मला एक रायफल घेऊन देऊन मदत करा,''असे कोनिकाने आवाहन केले होते. राष्ट्रीय स्पर्धेसाठी दोन वेळा पात्र ठरलेल्या या नेमबाजला प्रशिक्षक किंवा मित्रमेत्रीणींकडून रायफल मागावी लागायची. तिच्या ट्विटला सोनू सूदनं मार्चमध्ये उत्तर दिले आणि लवकरच तिला रायफल मिळेल, असे आश्वासन दिले होते आणि ते त्यानं पूर्णही केलं. दिग्गज नेमबाज जॉयदीप कर्माकर याच्या कोलकाता येथील अकादमीत कोनिका सराव करत होती. माहितीनुसार ती मागील ३-४ दिवसांपासून अकादमीतही गेली नव्हती. तिनं २०१६ व २०१७ मध्ये राष्ट्रीय स्पर्धेची पात्रता मिळवली होती, परंतु तिला पदक जिंकता आले नव्हते. 

टॅग्स :Sonu Soodसोनू सूदCrime Newsगुन्हेगारी