शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हिवाळी ऑलिम्पिक आजपासून; जगाच्या नजरा चीनकडे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 07:51 IST

स्पर्धेची सुरुवात बर्ड नेस्ट स्टेडियममध्ये उद्घाटन सोहळ्यासह होईल

बीजिंग : कोरोनाचे उगमस्थान असलेल्या असलेल्या चीनमध्ये हिवाळी ऑलिम्पिक २०२२ ला आज शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. युरोपातील चार देशांनी स्पर्धेच्या आयोजनास नकार दिल्यानंतर, अखेर बीजिंगने समस्येवर तोडगा काढला. कझाखस्तानही स्पर्धेत होता. पण अखेर आयओसीने बीजिंगला यजमान म्हणून निवडले. स्पर्धेची सुरुवात बर्ड नेस्ट स्टेडियममध्ये उद्घाटन सोहळ्यासह होईल. यासोबतच मानवाधिकाराचे उल्लंघन करणाऱ्या चीनकडे जगाचे लक्ष असणार आहे. कोरोना पसरविण्यास चीन कारणीभूत असल्याचा अनेक देशांचा आरोप आहे. मात्र चीनने हा आरोप कधीही मान्य केलेला नाही. पुढील अडीच आठवडे ९० देशांच्या २९०० खेळाडूंची स्कीईंग, स्केटिंग आणि स्लायडिंगची रोमहर्षक कौशल्ये पाहायला मिळणार आहेत. मानवाधिकाराचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून अमेरिकेसह अनेक देशांनी हिवाळी ऑलिम्पिकचा बहिष्कार केला. सहभागी खेळाडूंची दररोज कोरोना चाचणी होणार असून, कोणत्याही खेळाडूला हॉटेल आणि आयोजन स्थळाबाहेर जाण्याची परवानगी मिळणार नाही. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन हे उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. गलवान खोऱ्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतानेदेखील हिवाळी ऑलिम्पिककडे गांभीर्याने लक्ष घातलेले नाही. भारताचा एकमेव स्पर्धक ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे.भारताचा सोहळ्यावर बहिष्कारचीनने गलवान खोऱ्यातील संघर्षात सामील असलेल्या सैनिकाला टॉर्च बेअरर बनविताच भारताने कडाडून विरोध केला. ‘आमच्या देशाचे राजदूत कुठल्याही कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत,’ असे चोख प्रत्युत्तर भारताने दिले आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने गुरुवारी ही माहिती दिली. मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, ‘चीन ऑलिम्पिकआडून राजकारण खेळत आहे, ही दुर्दैवी बाब म्हणाली लागेल. बीजिंगमधील भारताचे कार्यवाहक राजदूत हिवाळी ऑलिम्पिकच्या उद्घाटनात किंवा समारोप सोहळ्यात सहभागी होणार नाहीत.’