रचना, क्रीडा प्रबोधिनीची विजयी सुरुवात
By Admin | Updated: May 11, 2014 19:47 IST2014-05-11T19:47:32+5:302014-05-11T19:47:32+5:30
जिल्हा कबड्डी स्पर्धांना प्रारंभ

रचना, क्रीडा प्रबोधिनीची विजयी सुरुवात
ज ल्हा कबड्डी स्पर्धांना प्रारंभ नाशिक : जिल्हा कबड्डी संघटना व क्रीडा प्रबोधिनीच्या वतीने आयोजित ४१ व्या कुमार व कुमारी गटाच्या आमदार जयंतराव जाधव चषक अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धांना आजपासून प्रारंभ झाला़ प्रारंभीच्या सामन्यात रचना क्लब व यजमान क्रीडा प्रबोधिनीसह इतर संघांनी विजय सलामी दिली़ यशवंत व्यायामशाळेच्या मैदानावर राज्य कबड्डी संघटनेचे सहसचिव प्रकाश बोराडे व उपस्थितांंच्या हस्ते नारळ वाढवून स्पर्धांचे उद्घाटन झाले़ याप्रसंगी संघटनेचे संजय पाटील, मोहन गायकवाड, दौलतराव शिंदे, आनंद खरे, दत्ता शिंपी, अशोक गरुड, प्रशांत भाबड आदि उपस्थित होते़ या स्पर्धेत जिल्ातील २० संघांनी सहभाग घेतला आहे़ आज झालेल्या स्पर्धेत कुमार गटात क्र ीडा प्रबोधिनी, जनता विद्यालय, नांदुर्डी, श्री साई समर्थ, जय बजरंग पांढुर्ली या संघांनी, तर कुमारी गटात रचना क्लबचे दोन संघ, गुलालवाडी, क्रीडा भारती या संघांनी विजयी सलामी देत घोडदौड सुरू केली आहे़ या स्पर्धेतून जिल्ाचे संघ निवडले जाणार असून, ठाणे येथे होणार्या राज्य स्पर्धेत ते नाशिकचे प्रतिनिधित्व करणार आहेत़ स्पर्धांचा समारोप रविवारी सायंकाळी होणार आहे़ फ ोटो क्रमांक - 10 पीएचएमए114फ ोटो ओळी - जिल्हा कबड्डी स्पर्धेत रंगलेला मुलींचा सामना़