धुळे, बारामती कृषी विद्यालय विजेते
By Admin | Updated: September 25, 2014 23:03 IST2014-09-25T23:03:57+5:302014-09-25T23:03:57+5:30
वडाळा : लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या वतीने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन खो-खो स्पर्धेत धुळे व बारामती कृषी विद्यालयाच्या अनुक्रमे मुला-मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावल़े

धुळे, बारामती कृषी विद्यालय विजेते
व ाळा : लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या वतीने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन खो-खो स्पर्धेत धुळे व बारामती कृषी विद्यालयाच्या अनुक्रमे मुला-मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावल़ेया स्पर्धेचे बक्षीस वितरण कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा़ शरद पाटील, प्राचार्य सतीश करंडे, धनंजय शिंदे, सचिन फुगे, क्रीडा संचालक विनायक सुतार आदींच्या उपस्थितीत झाल़े सूत्रसंचालन प्रा़ मंदार पवार तर आभारप्रदर्शन लक्ष्मण मिसाळ यांनी केल़े यासाठी महिबूब शेख, दयानंद पाटील, सलमान शेख, संजय कदम, नवनाथ जाधव, लक्ष्मण मिसाळ, व्यंकटेश आरगे, सागर महाजन, शिरीष कुलकर्णी, डॉ़ अमित छत्रे, रवींद्र वाकळे, अनिता पवार, मधुकर कचरे यांनी पर्शिम घेतल़ेया स्पर्धेत वडाळा, पानीव, अकलूज, बारामती, फलटण, कराड, कडेगाव, नारायणगाव, रेठरे, पुणे, धुळे, राहुरी, मालदाड, कोल्हापूर, नाशिक, नंदूरबार, जळगाव, मिरजगाव व संगमनेर आदी 39 संघातील 450 खेळाडूंनी भाग घेतला होता़स्पर्धेचा निकाल-मुले: कृषी महाविद्यालय, धुळे, कृषी महाविद्यालय कडेगाव़मुली: कृषी महाविद्यालय, बारामती, लोकमंगल महाविद्यालय, वडाळा़फोटोओळी-लोकमंगल कृषी महाविद्यालय आयोजित कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन खो-खो स्पर्धेतील विजेत्या संघांना बक्षीस देताना शरद पाटील, सतीश करंडे, सचिन फुगे, धनंजय शिंदे, विनायक सुताऱ