नेमबाज जीतू राय पिस्तूल चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता
By Admin | Updated: October 11, 2016 04:37 IST2016-10-11T04:37:37+5:302016-10-11T04:37:37+5:30
भारताचा अनुभवी पिस्तूल नेमबाज जीतू राय हा आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या (आयएसएसएफ) चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता ठरला आहे.

नेमबाज जीतू राय पिस्तूल चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता
नवी दिल्ली : भारताचा अनुभवी पिस्तूल नेमबाज जीतू राय हा आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या (आयएसएसएफ) चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता ठरला आहे.
जीतूने अंतिम लढतीत सर्बियाचा दामिर मिकेच याला २९-६, २८-३ अशा गुणफरकाने मागे टाकून स्पर्धा जिंकली. त्याला ट्रॉफीसह पाच हजार युरोचा रोख पुरस्कार मिळाला. रायफल चॅम्पियन्स ट्रॉफी मात्र रशियाचा सर्जेई कामेनस्की याने जिंकली. विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या सर्व नेमबाजांसाठी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले जाते. दहा मीटर एअर रायफल आणि १० मीटर एअर पिस्तूल या प्रकारात स्पर्धेचे आयोजन केले जाते. चार शॉटमध्ये सर्वांत कमी गुण नोंदविणारे नेमबाज एलिमिनेशनमध्ये बाहेर पडतात, हे विशेष.(वृत्तसंस्था)