कांगारुंकडून विंडीज फस्त

By Admin | Updated: December 6, 2015 01:44 IST2015-12-06T01:44:51+5:302015-12-06T01:44:51+5:30

प्रमुख खेळाडूंसह मोठ्या आशेने आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिज संघालामुख्य मालिकेतील पहिल्या चार दिवसीय सामन्यात १० गड्यांनी पराभवाचा सामना करावा लागला.

Windies fate from Kangarun | कांगारुंकडून विंडीज फस्त

कांगारुंकडून विंडीज फस्त

बिस्ब्रेन : प्रमुख खेळाडूंसह मोठ्या आशेने आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिज संघालामुख्य मालिकेतील पहिल्या चार दिवसीय सामन्यात १० गड्यांनी पराभवाचा सामना करावा लागला. पाहुण्या संघाने आपल्या पहिल्या डावात ड्वेन ब्राव्हो (५१) आणि कार्लाेस ब्रेथवेट (४७) यांच्या योगदानामुळे २४३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, आॅस्ट्रेलियाने ४४४ धावांचा डोंगर उभारला. यामध्ये मॅथ्यू शार्ट (७६), जेमी पीयर्सन (६४), जॅक कार्टर (५८) आणि जेम्स बॅजली (५०) यांनी शानदार योगदान दिले. दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजने खास असा संघर्ष केला नाही. त्यांचा डाव २१० धावांवर गडगडला. विंडीजकडून जेसन होल्डरने (६५) सर्वाधिक धावा केल्या. विंडीजकडून मिळालेले १० धावांचे लक्ष्य यजमान संघाने बिनबाद गाठले. आॅस्ट्रेलिया एकादश संघाकडून सायमन मिलेन्को याने पहिल्या डावात ७६ धावा देत पाच तर दुसऱ्या डावात कॅमरून ब्वायसने ८४ धावा देत ४ बळी घेतले. दरम्यान, आॅस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्याती तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याला १० डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. दुसरा सामना मेलबर्न येथे २६ रोजी, तर तिसरा कसोटी सामना सिडनी येथे ३ जानेवारी रोजी खेळविण्यात येईल.

Web Title: Windies fate from Kangarun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.