या विजयाची आवश्यकता होती : अॅलिस्टर कुक
By Admin | Updated: September 7, 2014 01:28 IST2014-09-07T01:28:19+5:302014-09-07T01:28:19+5:30
भारताविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या वन-डे सामन्यात विजय मिळविल्यामुळे इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कुक याने समाधान व्यक्त केले आह़े

या विजयाची आवश्यकता होती : अॅलिस्टर कुक
लिड्स : भारताविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या वन-डे सामन्यात विजय मिळविल्यामुळे इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कुक याने समाधान व्यक्त केले आह़े आम्हाला या विजयाची आवश्यकता होती, असेही त्याने म्हटले आह़े
कुक पुढे म्हणाला, की मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सतत होणा:या पराभवानंतर आम्हाला अशा विजयाची गरज होती़ खेळाडूंनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे भारताविरुद्ध विजय मिळाला आह़े आता यापुढेही कामगिरीत सातत्य राखण्याचा आमचा प्रयत्न राहणार आह़े पाचव्या वन-डे सामन्यात इंग्लंडच्या ज्यो रुटने 113 धावांची शानदार शतकी खेळी केली होती़ याच बळावर इंग्लंडने सामन्यात बाजी मारली़ यावर कुक म्हणाला, की कुकने ऐन मोक्याच्या क्षणी शतकी खेळी केली़ त्यानंतर गोलंदाजांनी आपली भूमिका योग्यरीत्या पार पाडली. यामुळेच आम्ही सामन्यात विजय मिळवू शकलो़ (वृत्तसंस्था)
भारतीय संघाविरुद्धचा अखेरचा एकदिवसीय सामना जिंकला असला, तरी आमच्याच मैदानावर आम्हाला या मालिकेत मात खावी लागली, याची खंत आह़े वन-डे वल्र्डकप काही दिवसांवर येऊ ठेपला असता, मालिका गमावणो आमच्यासाठी महाग ठरू शकत़े मात्र, आता आम्ही विजयी ट्रॅकवर परतलो आहोत़ वर्ल्डकपर्पयत कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रय} करू़ - अॅलिस्टर कुक