विल्यमसनची शानदार खेळी, दिल्लीला 192 धावांचे आव्हान
By Admin | Updated: April 19, 2017 21:58 IST2017-04-19T21:58:29+5:302017-04-19T21:58:29+5:30
आयपीएलच्या सामन्यात शिखर धवन आणि केन विल्यमसन यांच्या शानदार खेळीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने दिल्ली डेअरडेव्हिल्सला 192 धावांचे आव्हान दिले आहे.

विल्यमसनची शानदार खेळी, दिल्लीला 192 धावांचे आव्हान
>ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 19 - आयपीएलच्या सामन्यात शिखर धवन आणि केन विल्यमसन यांच्या शानदार खेळीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने दिल्ली डेअरडेव्हिल्सला 192 धावांचे आव्हान दिले आहे. या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने 20 षटकात चार बाद 191 धावा केल्या.
फलंदाज केन विल्यमसन आणि शिखर धवन यांनी या सामन्यात शानदार फटकेबाजी केली. केन विल्यमसन याने 51 चेंडूत पाच षटकार आणि सहा चौकार लगावत 89 धावांची खेळी केली. तर, शिखर धवने 50 चेंडूत एक षटकार आणि सात चौकार लगावत 70 धावा केल्या.
केन विल्यमसन याला गोलंदाज क्रिस मॉरीस याने श्रेयश अय्यर करवी झेलबाद केले. सनरायजर्स हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि युवराज सिंग यांना म्हणावी तशी फलंदाजी करता आली नाही. डेव्हिड वॉर्नर अवघ्या 4 धावांवर बाद झाला. त्याला गोलंदाज क्रिस मॉरीसने बाद केले. तर, युवराज सिंग तीन धावांवर त्रिफळाचीत झाला. मॉइसेस हेन्रिक्वेसने नाबाद 12 धावा आणि दिपक हुड्डाने नाबाद 9 धावा कुटल्या. तर संघाला जादाच्या 4 धावा मिळाल्या. दरम्यान, युवराज सिंगचा आजचा टी-20मधील 200 वा सामना आहे.
दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून गोलंदाज क्रिस मॉरीस यानेच सनरायजर्स हैदराबादचे चार बळी टिपले.