आश्विनची कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न करेन : सुंदर

By Admin | Updated: April 7, 2017 03:54 IST2017-04-07T03:54:49+5:302017-04-07T03:54:49+5:30

जर मला अंतिम संघात स्थान मिळाले, तर मी स्टार गोलंदाज रविचंद्र आश्विनची कमतरता भरून काढण्याचा पूर्ण प्रयत्न करेन

Will try to fill Ashwin's deficiency: Beautiful | आश्विनची कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न करेन : सुंदर

आश्विनची कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न करेन : सुंदर

चेन्नई : जर मला अंतिम संघात स्थान मिळाले, तर मी स्टार गोलंदाज रविचंद्र आश्विनची कमतरता भरून काढण्याचा पूर्ण प्रयत्न करेन, असे रायझिंग पुणे सुपरजायंट संघाचा नवोदित अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर याने म्हटले. सुंदरने याबाबत सांगितले की, ‘आश्विनसारख्या महान खेळाडूच्या जागी निवड झाली याचा मला खूप मोठा आनंद आहे. तसेच, आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाल्यानेही मी उत्साहित आहे. मी स्पर्धेविषयी कोणतीही आशा ठेवली नाही. मात्र, जर मला संधी मिळाली तर मला सज्ज राहावे लागेल.’ आघाडीच्या फळीतील फलंदाज असलेल्या सुंदरने भारताचे १९ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविडच्या सल्ल्यानंतर गोलंदाजीला सुरुवात केली.

Web Title: Will try to fill Ashwin's deficiency: Beautiful