संधीचा लाभ घेणार - धोनी
By Admin | Updated: June 22, 2014 00:25 IST2014-06-22T00:25:48+5:302014-06-22T00:25:48+5:30
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळताच सामन्यावर पकड निर्माण करून ही पकड टिकवण्याला आम्ही अधिक महत्त्व देणार आहोत,

संधीचा लाभ घेणार - धोनी
>मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळताच सामन्यावर पकड निर्माण करून ही पकड टिकवण्याला आम्ही अधिक महत्त्व देणार आहोत, असे मत टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने व्यक्त केले आह़े या दौ:यासाठी टीम इंडिया सज्ज असल्याचेही तो म्हणाला़
18 सदस्यीय भारतीय संघ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौ:यावर रविवारी रवाना होणार आह़े तत्पूर्वी धोनीने पत्रकार परिषदेत सांगितले की, मालिकेत भारतीय खेळाडू आक्रमक खेळ करण्यावर भर देणार आहेत़ मी स्वत:सुद्धा आक्रमक खेळ करणार आह़े आक्रमक खेळ केल्यास उत्कृष्ट कामगिरी होते, असे सांगून माही पुढे म्हणाला, संघ या मालिकेसाठी लवकरच इंग्लंडला रवाना होत आह़े ही संघासाठी जमेची बाजू आह़े
कारण भारतीय संघ कसोटी मालिकेपूर्वी दोन सराव सामने खेळणार आह़े त्यामुळे येथील वातावरणाशी ताळमेळ बसण्यास मदत होईल़ (क्रीडा प्रतिनिधी)