अजूनही चांगली कामगिरी करायची : विजेंदरसिंह
By Admin | Updated: November 8, 2015 23:36 IST2015-11-08T23:36:36+5:302015-11-08T23:36:36+5:30
भारताचा सुपरस्टार बॉक्सर विजेंदरसिंह याने आपल्या दुसऱ्या प्रो लढतीच्या पहिल्या फेरीत प्रतिस्पर्धी डीन गिलेन याला धूळ चारल्यानंतर तुम्ही माझ्या पंचमध्ये सुधारणा पाहू शकता

अजूनही चांगली कामगिरी करायची : विजेंदरसिंह
डबलीन : भारताचा सुपरस्टार बॉक्सर विजेंदरसिंह याने आपल्या दुसऱ्या प्रो लढतीच्या पहिल्या फेरीत प्रतिस्पर्धी डीन गिलेन याला धूळ चारल्यानंतर तुम्ही माझ्या पंचमध्ये सुधारणा पाहू शकता; परंतु माझी अजूनही चांगली कामगिरी करायची बाकी असल्याचे त्याने सांगितले.
सलग दुसऱ्या विजयानंतर विजेंदर म्हणाला की, ‘मला येथे खूप चांगले वाटले आणि रिंगमध्ये प्रवेश करताच मी डीनवर प्रहार करणे सुरू केले. डीनवर दबाव ठेवण्याची ही खूप चांगली वेळ आहे हे मला माहीत होते. रेफरीने सांगितले की तो खाली पडला; परंतु मला विश्वास वाटत नव्हता; परंतु जेव्हा तो पुन्हा माझ्यावर प्रहार करण्यासाठी उठला तेव्हा मी त्याच्यावरच प्रहार करणे सुरू केले आणि हा माझ्यासाठी चांगला अनुभव होता.’ आॅलिम्पिकपदक विजेता विजेंदर म्हणाला की, ‘पहिल्या लढतीनंतर मी माझ्यात खूप सुधारणा केली आणि त्याचा फायदा झाला, असे मला वाटते; परंतु माझी यापेक्षा चांगली कामगिरी करणे बाकी आहे. ही माझ्यासाठी एक सुरुवात आहे हे मला माहीत आहे आणि चॅम्पियन बनण्यासाठी खूप मार्ग पूर्ण करणे बाकी आहे. (वृत्तसंस्था)