पुणे विजयी लय राखणार?

By Admin | Updated: April 22, 2017 11:11 IST2017-04-21T23:50:12+5:302017-04-22T11:11:32+5:30

रायझिंग पुणे सुपरजायंटस् संघ शनिवारी गतविजेता सनरायजर्स हैदराबाद संघाविरुद्ध भिडेल. या सामन्यात धोनीच्या कामगिरीकडे पुणे संघाचे लक्ष असेल.

Will Pune win the winning streak? | पुणे विजयी लय राखणार?

पुणे विजयी लय राखणार?

पुणे : रायझिंग पुणे सुपरजायंटस् संघ शनिवारी गतविजेता सनरायजर्स हैदराबाद संघाविरुद्ध भिडेल. या सामन्यात धोनीच्या कामगिरीकडे पुणे संघाचे लक्ष असेल.
पाचपैकी तीन सामने गमविणारा पुणे संघ चार गुणांसह सातव्या स्थानावर आहे. या संघाला सलग पराभव पत्करावा लागल्यानंतर कर्णधार स्टिव्ह स्मिथ याने आरसीबीविरुद्ध पराभवाची मालिका खंडित केली होती. हैदराबादविरुद्ध देखील विजयी घोडदौड सुरू ठेवण्याचा त्यांचा इरादा असेल. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा फॉर्म मात्र संघासाठी चिंतेचा विषय आहे. पुण्याची फलंदाजी आतापर्यंत स्मिथ आणि अजिंक्य रहाणे यांच्याच भोवती रेंगाळत राहिली. याशिवाय अष्टपैलू बेन स्टोक्स याच्याकडून आशा आहेत. दुसरीकडे हैदराबाद तिसऱ्या स्थानी आहे. मुंबई व कोलकाताकडून पराभव पत्कारावा लागल्यानंतर हैदराबादने सलग दोन विजय मिळवले आहेत.

Web Title: Will Pune win the winning streak?