ड्रेसिंग रूममधील बाबी उघड करणार नाही : कोहली

By Admin | Updated: June 23, 2017 00:50 IST2017-06-23T00:50:23+5:302017-06-23T00:50:35+5:30

मी कधीच ड्रेसिंग रुममध्ये काय घडले, याचा खुलासा करणार नाही, असे भारतीय कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केले.

Will not reveal the contents in the dressing room: Kohli | ड्रेसिंग रूममधील बाबी उघड करणार नाही : कोहली

ड्रेसिंग रूममधील बाबी उघड करणार नाही : कोहली

पोर्ट आॅफ स्पेन : मी कधीच ड्रेसिंग रुममध्ये काय घडले, याचा खुलासा करणार नाही, असे भारतीय कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केले. राजीनामा देणारे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी कर्णधारासोबतचे संबंध अस्थिर झाल्याचे वक्तव्य केले आहे. त्याबाबत बोलताना कोहलीने वरील वक्तव्य केले.
कोहलीने या वादावर प्रथमच चर्चा केली. भारतीय कर्णधारासोबत मतभेदाच्या मुद्यावर कुंबळे यांनी दोन दिवसांपूर्वी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. कोहली म्हणाला,‘मी कुंबळे यांच्या राजीनामा देण्याच्या निर्णयाचा आदर करतो.’ त्यासोबत खेळाडू म्हणून मी त्यांचा आदर करतो, असेही विराट म्हणाला.
विंडीजविरुद्ध शुक्रवारी खेळल्या जाणाऱ्या पहिल्या वन-डे लढतीच्या पूर्वसंध्येला बोलताना विराट म्हणाला,‘अनिल (भाई) कुंबळे यांनी आपले विचार व्यक्त केले असून पदाचा राजीनामा देण्याच्या त्यांचा निर्णयाचा आम्ही आदर करतो. स्पर्धेनंतर ही घटना घडली आहे.’

रहाणे सलामीलाच खेळणार : कोहली
रोहित शर्माला विंडीजविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली असून भारतीय कर्णधार विराट कोहलीने शुक्रवारपासून प्रारंभ होणाऱ्या पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेत अजिंक्य रहाणे शिखर धवनच्या साथीने डावाची सुरुवात करणार असल्याचे सांगितले.

Web Title: Will not reveal the contents in the dressing room: Kohli